NCRB Report 2023: मुंबई आर्थिक राजधानी की आर्थिक गुन्ह्यांची राजधानी? NCRB अहवालात समोर आली धक्कादायक आकडेवारी

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (NCRB) प्रसिद्ध केलेल्या 2023 च्या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे.<br/>

NCRB Report 2023: मुंबई आर्थिक राजधानी की आर्थिक गुन्ह्यांची राजधानी? NCRB अहवालात समोर आली धक्कादायक आकडेवारी

NCRB Report 2023: भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले मुंबई आता आर्थिक गुन्ह्यांची राजधानी म्हणूनही समोर येत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (NCRB) प्रसिद्ध केलेल्या 2023 च्या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे.

NCRB अहवालातील आकडेवारी

2023 मध्ये मुंबईत 6,476 आर्थिक फसवणुकीचे प्रकरणे नोंदवली गेली, तर 2022 मध्ये ही संख्या 6,960 आणि 2021 मध्ये 5,671 होती. यामुळे 2022 च्या तुलनेत 484 प्रकरणांनी घट झाली असली तरी, मुंबईत सर्वाधिक आर्थिक गुन्हे घडल्याचे स्पष्ट होते. या गुन्ह्यांपैकी 37.9 टक्के प्रकरणांत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईनंतर हैदराबादमध्ये 5,728 प्रकरणे आणि जयपूरमध्ये 5,304 प्रकरणांसह आर्थिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

हेही वाचा – Uddhav Thackeray : 'लाडक्या बहिणींना 6 महिन्याचे हप्ते एकत्र द्या'; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

महाराष्ट्रातील आर्थिक फसवणुकीचा ट्रेंड 

राज्यातील आर्थिक फसवणुकीचे प्रकरणे गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहेत. 2021 मध्ये महाराष्ट्रात 15,550 प्रकरणे, 2022 मध्ये 18,729 आणि 2023 मध्ये 19,803 प्रकरणे नोंदवली गेली. देशभरात पाहता, राजस्थान 27,675 प्रकरणांसह पहिले, तेलंगणा 26,321 प्रकरणांसह दुसऱ्या आणि महाराष्ट्र 19,803 प्रकरणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक गुन्ह्यांमध्ये बँक व्यवहार, कंपन्या, ऑनलाइन व्यवहार आणि डिजिटल पेमेंट (UPI) यांचा मोठा वाटा आहे. डिजिटल व्यवहारांच्या वाढीमुळे सायबर फसवणुकीची पातळी झपाट्याने वाढली आहे. महाराष्ट्रात नोंदलेल्या प्रकरणांपैकी 54.9% प्रकरणांत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहेत.

हेही वाचा – Abu Azmi On Marathi : 'मराठीची काय आवश्यकता…?, अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे आक्रमक

मुंबईतील आर्थिक गुन्हे – वर्षानुवर्षे आकडेवारी

2021 – 5,671 प्रकरणे
2022 – 6,960 प्रकरणे
2023 – 6,476 प्रकरणे

महाराष्ट्रातील आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या

2021 – 15,550 प्रकरणे
2022 – 18,729 प्रकरणे
2023 – 19,803 प्रकरणे

दरम्यान, NCRB अहवालातून स्पष्ट झाले आहे की, मुंबईत आर्थिक व्यवहार जितक्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, तितकेच आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number