International Cyber Fraud : मुंबई पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड रॅकेट उघड; गोव्यातून 12 जणांना अटक

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन गेमिंगसाठी बनावट बँक अकाउंट आणि सिमकार्ड वापरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच गोव्यातून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पायधुनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास करताना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-2 ला माहिती मिळाली की, मुंबईत बनावट बँक खाती उघडून त्यातून आलेली सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन गेमिंगची रक्कम […]

International Cyber Fraud : मुंबई पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड रॅकेट उघड; गोव्यातून 12 जणांना अटक

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन गेमिंगसाठी बनावट बँक अकाउंट आणि सिमकार्ड वापरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच गोव्यातून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पायधुनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास करताना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-2 ला माहिती मिळाली की, मुंबईत बनावट बँक खाती उघडून त्यातून आलेली सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन गेमिंगची रक्कम गोव्यात पाठवली जात आहे. या माहितीच्या आधारे 4 ऑगस्ट 2026 रोजी गोव्यातील कळणगुट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओर्डा कॅंडोलिम येथे छापा टाकण्यात आला. यावेळी 12 इसमांना अटक करण्यात आली. 

हेही वाचा : Solapur Crime : सोलापूर हादरलं! साखरपुडा झाला, काही महिन्यांत लग्न होणार होत पण…; 22 वर्षीय तरुणासोबत भयंकर घडलं

या गुन्ह्यासंबंधी डीसीपी राज तिलक रोशन यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपींकडून 15 लॅपटॉप, 128 एटीएम कार्ड, 89 मोबाईल, 76 सिमकार्ड आणि 22 चेकबुक असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी 900 पॅनल आणि रुद्रा नावाच्या साईटचा वापर करून लोकांचे पैसे ऑनलाईन गेमिंग आणि सायबर फ्रॉडच्या माध्यमातून गोळा करायचे. त्यासाठी त्यांना 2 टक्के कमिशन मिळायचे. या रॅकेटचे सूत्रधार दुबईतून सर्व ऑपरेशन चालवत होते. आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी केली असता देशभरात 1930 हेल्पलाईनवर 83 सायबर फ्रॉडच्या तक्रारी नोंदल्या असल्याचे समोर आले आहे. आरोपींना 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number