Mahim Crime News: मुंबई हादरली! माहीममध्ये 13 वर्षीय विद्यार्थिनीचं अपहरण करून अत्याचार; नराधमांनी हात-पाय बांधले अन्…

अवघ्या 13 वर्षांच्या एका शाळकरी मुलीला गाठून तिचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mahim Crime News: मुंबई हादरली! माहीममध्ये 13 वर्षीय विद्यार्थिनीचं अपहरण करून अत्याचार; नराधमांनी हात-पाय बांधले अन्…

Mahim Crime News: राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील माहीम परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 13 वर्षांच्या एका शाळकरी मुलीला गाठून तिचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवून तपास जलद गतीने सुरू केला आहे.

शाळा सुटल्यावर घडला थरार

मिळालेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी संबंधित मुलगी माहीम येथील कनोसा शाळेतून शिक्षण संपवून नेहमीच्या मार्गाने घरी परतत होती. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलांनी तिला अडवले आणि जबरदस्तीने गाडीवर बसवून पळवून नेले. एका एकांत ठिकाणी नेल्यानंतर या नराधमांनी पीडितेचे हात, पाय आणि तोंड कापडाने बांधून टाकले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या गुन्ह्यात आणखी एका अज्ञात व्यक्तीचा सहभाग असल्याचा दावा पीडितेने केला आहे.

फोटो व्हायरल करण्याची धमकी अन् मुलीची भीती

अत्याचार केल्यानंतर आरोपींनी या कृत्याची वाच्यता केल्यास पीडितेचे फोटो मॉर्फ करून (एडिट करून) सोशल मीडियावर पसरवण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती. त्यामुळे सुरुवातीला तिने घाबरून कुटुंबापासून ही गोष्ट लपवून ठेवली. मात्र, नराधमांचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेल्याने शेवटी तिने धीर एकवटून संपूर्ण हकीकत पालकांना सांगितली.

हेही वाचा – Cyber Crime: ना OTP ना बँक डिटेल्स… WhatsApp वर फक्त एक फाईल ओपन केली अन् खात्यातून गायब झाले पावणेतीन लाख

पोलीस आणि पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई

मुलीच्या आपबितीनंतर संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ माहीम पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी नवीन 'भारतीय न्याय संहिता' (BNS) आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यातील कडक कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच वैद्यकीय तपासणी आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पीडितेला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number