Mumbai Crime: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलाने ‘ती’ गोळी खाल्ली अन् 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको ते कृत्य केलं

घराशेजारी राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने पाच वर्षांच्या चिमुरडीला लक्ष्य केले आणि तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केला.

Mumbai Crime: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलाने ‘ती’ गोळी खाल्ली अन् 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको ते कृत्य केलं

Mumbai Crime: काळजाला पीळ पाडणारी आणि संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी एक अत्यंत भयानक घटना मुंबईतील कांदिवली पश्चिम, लालजी पाडा परिसरात घडली आहे. जिथे घराशेजारी राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने पाच वर्षांच्या चिमुरडीला लक्ष्य केले आणि तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केला. या घृणास्पद कृत्यामुळे परिसरात आक्रोश आणि संतापाची लाट उसळली आहे.

क्रौर्याची कहाणी

प्राप्त माहितीनुसार, ही निरागस मुलगी घराबाहेर खेळत होती. याच वेळी शेजारील नराधम 16 वर्षांच्या मुलाने तिला गोड बोलून आपल्या घरात बोलावले. विश्वासाने घरात गेलेल्या त्या चिमुरडीवर त्याने पाशवी अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आला तेव्हा शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टमधून अविरत रक्तस्राव होत होता. तिला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हेही वाचा – Bhandara Crime News: धमकीप्रकरणी बच्चू कडूंचा नेता गोत्यात, नेमकं प्रकरण काय?

‘गोळी’ खाल्ली अन्….  

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कांदिवली पोलिसांनी त्वरित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिसांच्या चौकशीत आरोपीने दिलेले स्पष्टीकरण अधिकच धक्कादायक आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्याने एका गोळीचे सेवन केले होते, ज्यामुळे त्याला नशा चढली आणि काय करावे, याचे भान राहिले नाही, अशी कबुली त्याने दिली आहे. पोलीस त्याच्या या दाव्याची कसून तपासणी करत आहेत.

हेही वाचा – ‘न्याय नव्हे, विश्वासघात!’; पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याशी आईनेच बांधली लग्नगाठ

न्याय मिळेपर्यंत शांत नाही; स्थानिकांचा एल्गार

या संतापजनक घटनेमुळे लालजी पाडा परिसरात तणाव वाढला आहे. संतप्त नागरिकांनी एकजुटीने रस्त्यावर उतरून आरोपीला ‘फाशीची शिक्षा’ देण्याची मागणी केली आहे. अशा राक्षसांना कायद्याने कठोर शिक्षा झाल्यासच भविष्यात कोणाची अशी हिंमत होणार नाही, अशी मागणी स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे फक्त मुंबईचं नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. 

कांदिवलीच्या घटनेप्रकरणी आमदार योगेश सागर आक्रमक

कांदिवलीच्या या घटनेचे पडसाद थेट हिवाळी अधिवेशनातही पडले. आमदार योगेश सागर यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सभागृहात सांगितलं की, अत्याचार झालेल्या मुलीवर तीन ते चार तास उपचार करण्यात आले नाहीत. मेडिको लिगल केसच्या नावावर तीन तास चिमुरडीला उपचारासाठी वाट पाहावी लागली. कायदा बदलायची गरज असल्याचंही यावेळी त्यांनी नमूद केलं. तसेच या प्रकरणी डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही योगेश सागर यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number