सायन मधील आणिक बस आगारात उभ्या असलेल्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस आणिक बस आगारात उभी होती. यावेळी बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. या अपघातात 6 बस आगीत जळून खाक झाल्या आहेत. मात्र बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ दाखल करण्यात आल्या. या पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीची तीव्रता कमी करण्यात त्यांना यश आलं आहे. मात्र आग विझवण्याचे काम अद्याप सुरु आहे. तसेच डेपोतील इतर गाड्यांना आगीचा फटका बसू नये म्हणून उभ्या असलेल्या बस सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – मुंबईत खळबळ! ‘रामायण’च्या सेटवर अचानक आगीचा भडका; आगीचं कारण…
या अपघातात बसला आग लागल्याचे नेमके कारण अस्पष्ट असून बेस्ट प्रशासन व स्थानिक पोलीस यांचा तपास करत आहेत. परंतु 6 बसला आगीचा फटका बसल्यामुळे बस प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.