वर्सोवा समुद्रकिनारी गोणीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, अखेर पोलिसांनी लावला छडा; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत, नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.
versova beach mumbai
versova beach mumbai

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. देवाची वाडी, जेपी रोड येथील हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूस 1 ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. अखेर या पोत्यातील मृतदेहाचा उलगडा लागला आहे. पोलिसांना या मृत्यूचे गूढ उकलण्यात यश आले आहे. मृत व्यक्ती मालाड पश्चिम येथील संतोष मिश्रा या भाजीवाल्याकडे काम करत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तिथे जाताच संतोष मिश्रासह इतर कामगारही गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्ह्यानंतर आरोपी वेगवेगळ्या राज्यांत पसार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. जुन्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत करून हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत बांधून समुद्रात फेकल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 9 आणि वर्सोवा पोलिसांची संयुक्त कारवाई करत या हत्येचा तपास केला आहे. तर उत्तर प्रदेशातून आरोपी जुगाराज यादवला 7 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच 13 ऑक्टोबर रोजी संतोष मिश्रा आणि अन्य आरोपींना शोधून वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : “त्या घाणीला आपल्या पक्षातून बाहेर काढा…”, युनूस शेख यांच्या पक्षप्रवेशावरून नितेश राणे नाराज; महायुतीत नव्या वादाची ठिणगी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version