नागपूरकरांनी कायदा हातात घेतला! संतप्त जमावाच्या मारहाणीत संशयित चोराला बेदम मारहाण; जागीच मृत्यू

नागपूर मधील बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत काल दुपारी एक धक्कादायक घटना घडली.

नागपूरकरांनी कायदा हातात घेतला! संतप्त जमावाच्या मारहाणीत संशयित चोराला बेदम मारहाण; जागीच मृत्यू
Mob Lynching

नागपूर मधील बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत काल दुपारी एक धक्कादायक घटना घडली. चोरीच्या संशयातून संतप्त जमावाने दोन तरुणांना बेदम मारहाण केली, यात सुमेध राजेंद्र गजभिये याचा मृत्यू झाला आहे.

नेमके प्रकरण काय?

न्यू मनीषनगर येथील मॉडेल मिल सोसायटीत राहणाऱ्या उषा धार्मिक यांच्या घरात दुपारी 1.45 वाजता दोन अज्ञात व्यक्ती शिरल्या. एकाने गळ्याला चाकू लावून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. उषा यांनी आरडाओरड करत प्रतिकार केल्याने मंगळसूत्राचा अर्धा भाग तुटून आरोपींच्या हातात आला. याच वेळी त्यांची सून हॉलमध्ये आल्यावर आरोपींनी तिच्याकडेही पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. सूनेने प्रसंगावधान राखत खोलीत जाऊन दार लावले आणि कुटुंबियांना फोन केला.

आईस्क्रीम पार्लर चालवणारा उषा यांचा मुलगा मित्रांसह घरी पोहोचला तोपर्यंत शेजारीही जमा झाले होते. परिसरात दुचाकीजवळ उभे असलेले सुमेध गजभिये आणि त्याचा साथीदार दीपक पाटील हेच चोर असल्याच्या संशयातून जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मारहाण करणाऱ्या तिघांसह जखमी सुमेधला ताब्यात घेतले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर त्याचा साथीदार दीपक पाटील पसार झाला आहे.

दरम्यान, मृतक सुमेधवर 2017 मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number