रोजची मारहाण, अयोग्य नजर; अल्पवयीन मुलीने वडिलांसोबतचं…; नागपूर हादरलं!

Nagpur News : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत वडिलांकडून मुलीला मारहाण आणि अयोग्य जवळीक साधण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यात वार केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

रोजची मारहाण, अयोग्य नजर; अल्पवयीन मुलीने वडिलांसोबतचं…; नागपूर हादरलं!
Minor Girl Attacks Father

नागपूर : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे. दारुच्या नशेत वारंवार मारहाण करणाऱ्या आणि अयोग्य जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडीलांचा त्याच्यांच 17 वर्षीय मुलीने लाकडी बॅट डोक्यात वार करत जीव घेतला. मृत व्यक्तीचे नाव जयपाल बारेलाल खोलपिटणे असे आहे.

रोजची मारहाण, अयोग्य नजर
मिळालेल्या माहितीनुसार, जयपाल हे गेल्या अनेक दिवसांपासून दारुच्या आहारी गेले होते. जेव्हा ही दारु पिऊन घरी येत तेव्हा तेव्हा ते आपल्या मुलीला सतत शिवीगाळ आणि अमानुष मारहाण करत. फक्त एवढेच नाही तर ते तिच्यावर अयोग्य नजर ठेवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा-चिमुकलीच्या जन्माने घरात आनंद! अवघ्या 8 दिवसांत कुटुंबावर दुःखाचा डोंगर; रुग्णालयात गेल्यानंतर नेमकं काय घडलं?

घटने दिवशी नेमकं काय घडलं?
सोमवारी रात्री तर वडिलांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या. रात्री दारुच्या नशेत घरी आले. त्यानंतर जयपाल यांनी आपल्याच मुलीसोबत जबरदस्तीने अयोग्य जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला तातडीने जोरदार विरोध केला असता, त्याने तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रोजच्या होणाऱ्या त्रासाला आणि त्या रात्रीच्या अशा कृत्याला कंटाळून मुलीचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात तिने घरात असलेली लाकडी बॅट उचलली आणि वडिलांच्या डोक्यावर जोरादर मारली. हा वार इतका जोरदार होता की जयपाल गंभीर होत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलीसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number