Pranit More FIR News : स्टॅंडअप कॉमेडियन प्रणित मोरे महिला आयोगाच्या रडारवर; महाराष्ट्र साइबर सेलमध्येही FIR दाखल

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 370 रुपयांची बिर्याणी या वादग्रस्त कॉमेडी शोतील एका क्लिपनंतर निर्माण झालेल्या वादामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Pranit More FIR News : स्टॅंडअप कॉमेडियन प्रणित मोरे महिला आयोगाच्या रडारवर; महाराष्ट्र साइबर सेलमध्येही FIR दाखल

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणी काही थांबायचे नाव घेत नाहिये. सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर आता यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 370 रुपयांची बिर्याणी या वादग्रस्त कॉमेडी शोतील एका क्लिपनंतर निर्माण झालेल्या वादामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिला आयोगाकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राष्ट्रीय महिला आयोगाची कडक भूमिका घेतली आहे.  हरियाणाचे डीजीपींना कारवाईचे निर्देश दिले आहेत. गुरुग्राम येथील कॉमेडी शो प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) हरियाणा पोलिस महासंचालकांना (DGP) योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी आयोगाने प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांना २२ जून रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये आणि संबंधित तक्रारींची दखल घेत आयोगाने ही कारवाई केली असून, प्रकरणाची सुनावणी २२ जून रोजी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

गुरुग्राम येथे झालेल्या एका स्टँड-अप शोदरम्यान प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या चर्चेत ‘370 रुपयांची बिर्याणी’चा संदर्भ देत वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली होती.  महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सोशल मीडिया वाद निर्माण झाला. या प्रकरणानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत प्रणित मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 370 रुपयांची बिर्याणी या वादग्रस्त कॉमेडी शोतील एका क्लिपनंतर निर्माण झालेल्या वादामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

ही घटना व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक युजर्सनी यावर कठोर कारवाईची मागणी केली असून, प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे.

कंपनी आणि अधिकाऱ्यांची भूमिका

या वादानंतर संबंधित संस्थांकडूनही तपास सुरू असून, कंटेंटच्या स्वरूपावर आणि प्रसारणावर कायदेशीर दृष्टिकोनातून चौकशी केली जात आहे. तसेच संबंधित व्हिडिओ आणि कंटेंटच्या तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number