Newlywed Woman Death: महिन्याभरापूर्वी झालेल्या लग्नाचा करुण अंत! 16 व्या मजल्यावरून पडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

ही निव्वळ आत्महत्या आहे, अपघाती घटना आहे की यामागे काही मोठा कट रचण्यात आला आहे, याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस सखोल तपास करत आहेत.

Newlywed Woman Death: महिन्याभरापूर्वी झालेल्या लग्नाचा करुण अंत! 16 व्या मजल्यावरून पडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

Noida Newlywed Woman Death after Falling from 16th floor: लग्नाला अवघा 1 महिना पूर्ण झालेल्या 24 वर्षीय तरुणीचा धक्कादायक स्थितीत मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली आहे. इमारतीच्या 16 व्या मजल्यावरून खाली पडल्याने या तरुणीचा अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास ही घटना घडली. अचानक मोठ्या आवाजाने परिसर हादरला, तेव्हा रहिवाशांनी धाव घेतली असता कामिनी कुमारी (वय 24) फ्लॅट नंबर 1602 च्या गॅलरीतून खाली पडल्याचे निदर्शनास आले. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

अवघ्या 1 महिन्यापूर्वी झाले होते लग्न; फॉरेन्सिक टीमकडून पाहणी
मूळची एटा येथील रहिवासी असलेली कामिनी कुमारी हिचा विवाह 11 जुलै रोजी देहरादून येथील रहिवासी असलेल्या मंथन धीमानसोबत पार पडला होता. मंथन हा एका खासगी कंपनीत व्हिडिओ एडिटर म्हणून कार्यरत आहे, तर कामिनीपूर्वी एका बीपीओमध्ये नोकरी करत होती. लग्नानंतर दोघेही नोएडामधील सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमने संपूर्ण घराची कसून पाहणी केली, मात्र पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळून आली नाही. उत्तर प्रदेशातील नोएडामधील सेक्टर-39 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'डिव्हाईन मीडोज' सोसायटीमधील लिली टॉवरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

हेही वाचा – Dhule Crime: साक्रीत पत्नीची दगडाने ठेचून हत्या; घटनेनंतर अवघ्या दोन तासांत संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

पतीने सांगितला नैराश्याचा दावा; माहेरच्यांचा हुंडाबळीचा गंभीर आरोप
या दुर्दैवी घटनेनंतर कामिनीचे माहेरचे नातेवाईक तातडीने नोएडामध्ये दाखल झाले. त्यांनी पती मंथनवर लग्नानंतर लगेचच हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा थेट आरोप केला आहे. हुंड्याच्या छळाला कंटाळूनच तिची हत्या करण्यात आल्याचा किंवा तिला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडल्याचा दावा माहेरच्यांनी केला आहे. दुसरीकडे, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पती मंथनने असा दावा केला आहे की कामिनी गेल्या काही काळापासून गंभीर नैराश्यात (Depression) होती आणि तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.

पतीविरोधात गुन्हा दाखल; पोलीस करत आहेत सखोल तपास
माहेरच्या मंडळींनी दिलेल्या अधिकृत तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती मंथन धीमानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कामिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही निव्वळ आत्महत्या आहे, अपघाती घटना आहे की यामागे काही मोठा कट रचण्यात आला आहे, याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस सखोल तपास करत आहेत. या तरुणीच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे परिसरात मन अत्यंत सुन्न करणारी शांतता पसरली आहे.

हेही वाचा – Amravati: अमरावती गोळीबाराचा 24 तासांत पर्दाफाश; स्वतःच्याच घरावर गोळीबाराची निलंबित तलाठ्याने दिली सुपारी? आरोपी अटकेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number