Riteish Deshmukh: ‘तरच नराधम थरथर कापतील…’ नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुखचा संताप; ‘चौरंग’ शिक्षेचा संदर्भ देत केली ‘ही’ मागणी

रितेशने केवळ या घटनेचा निषेधच केला नाही, तर अशा नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कठोर शिक्षेची आठवण करून देत तात्काळ न्यायाची मागणी केली आहे.<br/>

Riteish Deshmukh: ‘तरच नराधम थरथर कापतील…’ नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुखचा संताप; ‘चौरंग’ शिक्षेचा संदर्भ देत केली ‘ही’ मागणी

Riteish Deshmukh: पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या अमानवीय अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेचे पडसाद आता मनोरंजन सृष्टीतही उमटत असून, प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने यावर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रितेशने केवळ या घटनेचा निषेधच केला नाही, तर अशा नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कठोर शिक्षेची आठवण करून देत तात्काळ न्यायाची मागणी केली आहे.

शिवरायांच्या 'चौरंग' शिक्षेचा उल्लेख अन् संताप
चित्रपटाच्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या रितेशने या घटनेवर भाष्य करताना ऐतिहासिक संदर्भाचा आधार घेतला. तो म्हणाला की, "अशा घटना ऐकल्यानंतर मनात प्रचंड राग आणि संताप निर्माण होतो. आजही महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या मनात कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही. अशा वेळी असे वाटते की, शिवरायांच्या काळात स्त्रियांवर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना जी 'चौरंग' करण्याची शिक्षा दिली जायची, तसाच धाक आजही निर्माण व्हायला हवा." गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती नसल्यानेच अशा घटना वारंवार घडत असल्याचे त्याने नमूद केले.

फास्ट ट्रॅक कोर्ट आणि तात्काळ शिक्षेची मागणी
रितेशने केवळ संताप व्यक्त न करता प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्याही मांडल्या आहेत. काळाप्रमाणे कायदे बदलले असले तरी त्यांची अंमलबजावणी तितकीच वेगवान असायला हवी, असे त्याने सांगितले. रितेशने म्हटलं प्रशासनाला विनंती केली आहे की, पोलीस आणि सरकारने कोणत्याही दबावाशिवाय या प्रकरणात कडक पावले उचलावीत. हा खटला वर्षानुवर्षे न ओढता फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून लवकरात लवकर निकालात काढावा. जेव्हा गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळेल, तेव्हाच अशा विकृत प्रवृत्तींच्या मनात धडकी भरेल.

हेही वाचा – Pravin Tarde On Pune Bhor Crime Update: "त्या नराधमाचे एन्काऊन्टर झाले तरच मानू, अन्यथा…" नसरापूर प्रकरणी प्रवीण तरडे संतापले, पोस्ट करत दिला थेट इशारा

सोशल मीडियावर समर्थनाचा ओघ
नसरापूर येथील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून आवाज उठवला जात आहे. रितेश देशमुखने घेतलेल्या या भूमिकेला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे. "कायद्याचा धाक निर्माण झालाच पाहिजे," अशा कमेंट्स करत नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत. सध्या हे प्रकरण अत्यंत संवेदनशील वळणावर असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number