48 तासांत राज्यात चौथी भीषण आगीची घटना! पंढरपुरात अग्नितांडव; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

राज्यात अग्निकांडाच्या घटना वाढत असून, कालपासून 3 ते 4 घटना समोर आल्या आहेत.

48 तासांत राज्यात चौथी भीषण आगीची घटना! पंढरपुरात अग्नितांडव; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

राज्यात अग्निकांडाच्या घटना वाढत असून, कालपासून 3 ते 4 घटना समोर आल्या आहेत. त्यात आता आणखी एका दुर्घटनेची भर पडली आहे. पंढरपूर-माढा तालुक्यातील मोडनिंब येथील दत्तनगर भागात असलेल्या गणपती मंदिराजवळ ही आग लागल्याची घटना घडली आहे. येथे जलजीवन मिशनच्या पाईप्स अनेक दिवसांपासून जमा करून ठेवण्यात आल्या होत्या, त्यांना अचानक आग लागली.

आग लागताच काही क्षणातच आगीचे मोठे लोट दिसू लागले. परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीचे नेमके कारण आणि जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, धुराचे प्रचंड लोट लांबूनही स्पष्टपणे दिसत होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गणपती मंदिराचे मोठे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number