Chennai Airport Incident : अस्वस्थ वाटलं, घाबरला अन् त्याने थेट धावत्या विमानातून उडी मारली! 231 प्रवाशांचा जीव टांगणीला; लँडिग पूर्वीच एअरपोर्टवर घडला विचित्र प्रकार

3 मे रोजी शारजाहहून चेन्नईला येणाऱ्या एअर अरेबिया या विमानात विचित्र घटना घडला. एका प्रवाशाने थेट चालत्या विमानातून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Chennai Airport Incident : अस्वस्थ वाटलं, घाबरला अन् त्याने थेट धावत्या विमानातून उडी मारली! 231 प्रवाशांचा जीव टांगणीला; लँडिग पूर्वीच एअरपोर्टवर घडला विचित्र प्रकार

3 मे रोजी शारजाहहून चेन्नईला येणाऱ्या एअर अरेबिया या विमानात विचित्र घटना घडला. एका प्रवाशाने थेट चालत्या विमानातून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाने लँडिंगनंतर टॅक्सीवेवर असताना आपत्कालीन दरवाजा उघडून उडी मारली, या घटनेदरम्यान प्रवाशाला कोणतीही जीवितहानी झाली नसून 29 वर्षीय प्रवाशाला CISF ने ताब्यात घेतले आहे. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे एका प्रवाशाच्या अजब कृत्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे विमानातील 231 प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा- Rescues Children Water Tank: दोन मिनिटांचं रील बेतलं जीवावर, 16 तासांनंतर बचावासाठी एअरफोर्सच दाखल,रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3:23 च्या सुमारास शारजाहून चेन्नईला येणाऱ्या एअर अरेबियाचे एअरबस ए320 फ्लाईट जी9 471 हे विमान विमानतळ टर्मिनलवरून धावपट्टीकडे येत होते. विमान मुख्य रनवे सोडून पार्किंगच्या दिशेने संथ गतीने जात होते. मात्र विमान पूर्णपणे थांबण्यापूर्वीच एक व्यक्ती विमानतळाच्या व्यावसायिक भागाकडे धावला आणि प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडला आणि खाली उडी मारली. हे दृष्य पाहताच विमानात असणारे इतर 231 प्रवाशांमध्ये काही क्षणांसाठी घबराट पसरली. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ पकडले. यावेळी विमान संथ गतीने असल्याने केवळ उडी मारताना त्या प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. 

29 वर्षीय मोहम्मद शरीफ मोहम्मद नज्मुद्दीन या प्रवाशाने प्रवासादरम्यान त्याला मळमळत होते आणि त्याने दोनदा उलट्याही केल्या होत्या होता. त्यामुळे घाबरल्याच्या स्थितीत त्याने विमानातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असावा. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन केले जात आहे. हा प्रवासी तामिळनाडूतील पुदुक्कोट्टाईचा रहिवासी आहे. या सुरक्षा त्रुटीमुळे विमानतळ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य धावपट्टी पहाटे 03:23 ते 04:23 या वेळेत बंद ठेवली होती. या काळात अनेक विमानांना विलंब झाला आणि एका विमानाचा मार्ग बदलावा लागला. सुमारे एका तासानंतर विमानतळाचे कामकाज पूर्ववत झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number