अमरावती मधील काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केली आहे. त्यांच्या जीवितेला धोका असल्याचा दावा त्यांनी या तक्रार पत्रात दाखल केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानावरून ड्रोनद्वारे घिरट्या घालून छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा त्यांचा आरोप आहे.
अमरावती शहरातील गणेडिवाल लेआउट मध्ये ते निवास करतात. काल दिनांक २८ सप्टेंबर, सोमवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानवरून ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. यामुळे यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टशनमध्ये तक्रार करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच ड्रोनद्वारे निवासस्थानाचे छायाचित्रण करून घातपात होण्याची शक्यता असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
यासंदर्भात पोलीस तपास सुरु आहे. लवकरच या ड्रोनद्वारे आरोपी व्यक्तीला जेरीस धरले जाईल. तूर्तास एका राजकीय नेत्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.