Shocking Crime : डोक्यात गेला.. विषय संपला! लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराची गर्भवती प्रेयसीने केली निर्घृण हत्या

पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात आरोपी असलेली तरुणी <br/>अल्पवयीन असून ती गर्भवती आहे. प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यावर तिने टोकाचे पाऊल उचलले.

Shocking Crime : डोक्यात गेला.. विषय संपला! लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराची गर्भवती प्रेयसीने केली निर्घृण हत्या

रायपूर (छत्तीसगड): छत्तीसगडमधील रायपूर येथे एका 16 वर्षीय गर्भवती मुलीला तिच्या प्रियकराच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन मुलीनेच बिलासपूरमधील कोनी पोलीस ठाण्यात हत्येची माहिती देऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

लॉजमध्ये झाली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरानजीकच्या गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'ए-वन लॉज'मध्ये मोहम्मद सद्दाम (बिहारचा रहिवासी) नावाच्या तरुणाची हत्या झाली. सोमवारी (30 सप्टेंबर 2025) लॉजच्या कर्मचाऱ्यांनी एका खोलीत संशयास्पद हालचालीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता, तिथे सद्दामचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

गर्भवती प्रेयसीने घेतला सूड
पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात आरोपी असलेली बिलासपूर येथील अल्पवयीन मुलगी (वय 16 वर्षे) आणि कुरूद भागात राहणाऱ्या सद्दामचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिने सद्दामवर लग्नासाठी दबाव टाकला. मात्र, सद्दामने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. सद्दामने फसवणूक केल्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने एक भयंकर पाऊल उचचले.

हेही वाचा – Uttar Pradesh Crime: पाचवे लग्न करणार म्हणून मुलाकडून वडिलांचा खून, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

सद्दाम आणि त्याची प्रेयसी शनिवारी (28 सप्टेंबर 2025) 'ए-वन लॉज'मध्ये आले होते. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून पुन्हा जोरदार वाद झाला. सद्दाम झोपलेला असताना, मुलीने रागाच्या भरात त्याच्याच धारदार शस्त्राने त्याची हत्या केली.

चावी रेल्वे रुळावर फेकून बिलासपूरला पळाली
हत्या केल्यानंतर आरोपी मुलीने खोलीला कुलूप लावले आणि ती चावी रेल्वेच्या रुळांवर फेकून थेट बिलासपूरला गेली. बिलासपूरला पोहोचल्यावर तिने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आई आणि मुलगी दोघीही कोनी पोलीस ठाण्यात गेल्या. तिथे मुलीने सद्दामच्या हत्येची कबुली दिली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी मुलीला रायपूर येथे आणले असून, तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – Dimple Hayathi: 'कुत्र्यासारखं वागवलं आणि…', 'या' अभिनेत्रीवर मोलकरणीचे गंभीर आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number