हडपसर येथील कामधेनू इस्टेटमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवून संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) मोठे यश आले आहे. हडपसरच्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला अखेर नागपूर मधून अटक केली आहे. सोलापूरच्या कवठे गावचा शिवाजी राठोड याला आज सकाळी नागपूर मधून ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र एटीएसने ही कामगिरी बजावली.
दरम्यान हडपसर बॉम्ब प्रकरणावर पुणे पोलिसांचे मोठे खुलासे समोर आले असून आरोपीची CCTV द्वारे ओळख पटवण्यात आली. आरोपीला आज रात्री पुण्यात आणणार आहेत. आरोपीने व्यक्तिगत कारणास्तव हे कृत्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी 10 तारखेला व्यक्तिगत तपासणीसाठी उषा किरण हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी गेला. त्यावेळेस त्याचा आर्थिक वाद झाला त्यामुळे त्याने असे कृत्य केले असल्याची माहिती आहे. त्याने बॉम्ब साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागीविले होते. तसेच बॉम्ब तयार करताना कोणतेही स्पोटक वापरले नव्हते. आरोपी मूळ सोलापूरचा असून सध्या पुणे येथील मांजरी जवळ राहत होता.
पुण्यातील हडपसर परिसरात रात्री जिवंत बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आतापर्यंत तब्बल 13 संशयितांची चौकशी केली आहे. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची अनेक पथके काम करत असून लवकरच संबंधित आरोपीला ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून बॉम्बशोधक पथक आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.