काळाचा मोठा घात! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली; भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू

पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

काळाचा मोठा घात! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली; भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही बस सकाळी 5 च्या सुमारास बंगाजवळील मंजारी गावामधील उड्डाणपुलाहून खाली कोसळली. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात असून बाकी जण गंभीर जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी व काही पर्यटक प्रवास करत होते. ही बस मनालीहून पंजाबला जात होती, यावेळी बस चालकाचा डोळा लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन उड्डाणपुलाहून खाली पडली. हा अपघात इतका भीषण होता की बसचा चक्काचूर झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस व मदत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु झाले व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यात बस चालक, एलपीयुचा एक विद्यार्थी यांचा जागीच मृत्यू झाला, तिसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. अनेकजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या अपघाताचा पोलीस तपास सुरू असून, बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. प्रशासनाने मृतांचा आकडा अधिकृतपणे जाहीर केलेला नाही.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number