Raigad Crime News: रायगड जिल्हा हादरला! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून अत्याचार

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिला धाक दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

Raigad Crime News: रायगड जिल्हा हादरला! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून अत्याचार

Raigad Crime News: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुका पुन्हा एकदा एका संतापजनक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने हादरला आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिला धाक दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून म्हसळा पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींपैकी 2 संशयित अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – Nithari Killings Case : 20 वर्ष जुन्या निठारी हत्याकांड प्रकणातील मुख्य आरोपी सुरेंद्र कोळीचा संशयास्पद मृत्यू; चहाच्या टपरीवर आढळला मृतदेह

धमक्या देऊन वारंवार शोषणाचा आरोप 

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ओळखीचा फायदा घेत आरोपींनी तिला धमकावले आणि तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी नोंदवलेल्या तक्रारीत नमूद आहे की, एप्रिल ते जून 2026 या कालावधीत मुलीच्या घराचे नूतनीकरण आणि बांधकामाचे काम सुरू होते. घर रिकामे असल्याचे पाहून एका 40 वर्षीय गवंड्याने (मिस्त्री) जबरदस्तीने घरात घुसून तिच्यावर पहिला अत्याचार केला. त्यानंतर इतर ओळखीच्या तरुणांनीही तिला वेगवेगळ्या प्रकारे धाकाखाली ठेवून तिचे शोषण केले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील अत्यंत कडक कलमांन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

महिनाभरात दुसरी दुर्दैवी घटना उघडकीस 

म्हसळा परिसरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची ही महिनाभरातील दुसरी घटना असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची भीती आणि प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी 23 ऑगस्ट रोजीही अशाच एका गुन्ह्याची नोंद झाली होती. लागोपाठ घडणाऱ्या या प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाने पीडितेची ओळख गोपनीय ठेवत संपूर्ण घटनाक्रम, पुराव्यांची तपासणी आणि प्रत्येक आरोपीचा या गुन्ह्यातील थेट सहभाग शोधण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number