सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला, पण आता आयुष्याला अनपेक्षित वळण! मेहुण्याने तब्बल 13 वेळा…; अख्खं शहर हादरलं

Crime News : गुजरातच्या राजकोटमध्ये प्रेमविवाहानंतर सात वर्षांनी एका कुटुंबात धक्कादायक घटना घडली. मेहुण्याने तरुणावर तब्बल १३ वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून, घटनेमागील कारणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला, पण आता आयुष्याला अनपेक्षित वळण! मेहुण्याने तब्बल 13 वेळा…; अख्खं शहर हादरलं
Crime News

गुजरातच्या राजकोटमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. प्रेमविवाहानंतर 7 वर्षे संसार थाटलेल्या दाम्पत्याच्या आयुष्याला अचानकच भीषण वळण मिळालं आहे. एका घटनेने हसतं-खेळंत कुटुंब उद्ध्वस्त झालं असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये राहत असलेल्या विमलने सात वर्षांपूर्वी शीतल हिच्याशी प्रेमविवाह केला होता. या दोघांच्या लग्नाला शीतलच्या घरच्यांना विरोध होता. त्यामुळे कुटुंबाने तिच्याशी संपूर्ण संबंध तोडले होते. काही दिवसांपूर्वीच विमलने पत्नी शीतलसाठी एक नवी गाडी घेतली होती. मात्र, नव्या गाडीची आरसीसी करण्यासाठी त्याने सासरचा पत्ता वापरला. आरसी बुक हे सासरी गेल्याने शीतलच्या घरच्यांना राग आला आणि पुन्हा जुने वाद उफाळून आले.

हेही वाचा – वाद मिटवण्यासाठी बोलावलं, पण रक्तरंजित शेवट! वर्ध्यात 21 वर्षीय अभिजीतवर धारदार शस्त्राने हल्ला

आरोपी कमले अर्थात विमलचा मेहुण्याने आरसी बुक देण्याच्या बहाण्याने त्याला फोन करत दुकानाजवळ बोलावून घेतले. दुकानाजवळ येताच त्याच्यावर अवघ्या 23 सेकंदात 13 वेळा चाकून वार केले गेले. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला. गंभीर अवस्थेत असलेल्या विमलला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासणीनंतर मृत घोषित केले.

पत्नीने केली ही मागणी
घटनेनंतर पत्नी शीतलच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुख्य आरोपी कमलेश धंडाल आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. या प्रकरणात पत्नीने भावाला फाशीची मागणी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number