Sachin Ahir : धक्कादायक! सचिन अहिर यांच्या घरावर 2.65 कोटींचा डल्ला; धक्कादायक खुलास्याने पोलिसही चक्रावले

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील घरातून चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

Sachin Ahir : धक्कादायक! सचिन अहिर यांच्या घरावर 2.65 कोटींचा डल्ला; धक्कादायक खुलास्याने पोलिसही चक्रावले

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील घरातून चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सचिन आहिर यांच्या घरातून मागील अनेक महिन्यांपासून मौल्यवान दागिने, पैसे आणि रोख रक्कम अशी एकूण 2.65 कोटींची चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रकरणांचं गांभीर्य ओळखून हा गुन्हा पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखा 3 कडे वर्ग केला होता.

हेही वाचा- Maharashtra Politics : "ठाकरेंनी म्हटलं म्हणजे चांगलीच गोष्ट" ठाकरेंच्या आंदोलनावर शिंदे सेनेतील नेत्याच्या विधानाने रंगली नवी चर्चा

या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने प्रवीण रमेश सोलंकीला (45 वर्ष)अटक केली, जो गेल्या 24 वर्षांपासून त्या घरात काम करत होता. सोलंकी याला काल मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रवीण सोलंकी गेल्या 24 वर्षांपासून त्यांच्या घरात साफसफाई करत होता.

कुटुंबाचा त्याच्यावर इतका विश्वास होता की, गेल्या 3 वर्षांपासून त्याला त्यांच्या वरळीतील कार्यालयाच्या साफसफाईची जबाबदारीही देण्यात आली होती. सोलंकीच्या चौकशीनंतर त्याने ताडदेव येथील सोनाराकडे विकलेला डायमंड ज्याची किंमत 39 लाख आहे ही हस्तगत केली आहे. या प्रकरणात इतरही दोन आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number