Tuesday, November 18, 2025 09:52:46 PM

Sachin Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घालवळमुळे भावाचा पाय खोलात, सचिन घायवळवरील A to Z गुन्ह्यांची यादी समोर

पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या गुंडगिरीमुळे त्याचा भाऊ देखील अडचणीत आला आहे. पुणे पोलिसांनी आता निलेश घायवळ याच्यासह सचिन घायवळवर सुद्धा मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

sachin ghaiwal कुख्यात गुंड निलेश घालवळमुळे भावाचा पाय खोलात सचिन घायवळवरील a to z गुन्ह्यांची यादी समोर

पुणे: पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या गुंडगिरीमुळे त्याचा भाऊ देखील अडचणीत आला आहे. पुणे पोलिसांनी आता निलेश घायवळ याच्यासह सचिन घायवळवर सुद्धा मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सचिन घायवळला देखील कोथरूड पोलिसांनी आरोपी केलं आहे. त्यामुळे दोघा भावांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पुण्यातील कोथरूडमध्ये एका व्यक्तीवर घायवळच्या टोळीने छोट्या कारणातून गोळीबार केला. या घटनेनंतर घायवळ गँगवर  पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. त्यातच निलेश घायवळ हा पासपोर्टमध्ये हेराफेरी करून लंडनला फरार झाला. यानंतर त्याचा भाऊ सचिन घायवळ हा पिस्तुल परवाना प्रकरणात सापडला. त्यामुळे पुणे पोलिसांनी कोथरूड गोळीबार प्रकरणी सचिन घायवळवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आधी निलेश घायवळ याच्यासह त्याच्या साथीदारांवर कोथरूड गोळीबार प्रकरणी मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच गुन्ह्यात सचिन घायवळ याला देखील मोका लावण्यात आला आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पिस्तुल परवाना प्रकरणात कुख्यात गुंड सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला होता. या परवान्यास पोलिसांचा विरोध असून सुद्धा कदमांनी शस्त्र परवाना दिला होता. घायवळ याच्यावर कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद नाही म्हणून त्यांना मी शस्त्र परवाना दिला असे योगेश कदमांनी म्हटले होते. मात्र सचिन घायवळवरील गुन्ह्याची यादीच समोर आली आहे.

हेही वाचा: Kolhapur School Ragging : लहान मुलांना लाथाबुक्क्या, बॅटने मारहाण! कोल्हापुरातील निवासी शाळेत रॅगिंगचा संतापजनक प्रकार; Video आला समोर

सचिन घायवळवरील गुन्ह्यांची यादी
महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा (मोक्का) - निलेश घायवळ गँगचा प्रमुख सचिन घायवळ सदस्य म्हणून गुन्हेगारी कारवाईमध्ये सहभाग आहे. पप्पू ऊर्फ सचिन कुडले खून प्रकरणात आरोपी क्रमांक 3 (अ‍पील क्रमांक 25/2014 पुणे (स्पेशल कोर्ट) 2014 बॉम्बे हायकोर्ट अ‍ॅपील तपास चालू)

खुनाचा प्रयत्न शत्रू गँगविरुद्ध हल्ले आणि धमक्या. निलेशच्या टोळीशी जोडलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभाग.पुणे शहर (कोथरूड) 2010-2015 (जुने केसेस; पुरावे सुरू)

शस्त्र कायदा बेकायदेशीर शस्त्रे सोबत धरले जाणे किंवा वापरणे. याआधी दाखल गुन्हा असतानाही नवीन शस्त्र परवाना मंजूर झाल्याने वाद.पुणे 2014-2025 (चालू तपास)

गुन्हेगारी कारवाया खंडणी, मारहाण आणि टोळीशी संबंधित गुन्हे. विरोधी गँगशी वैरामुळे 2014 मध्ये दोन सदस्यांच्या खुनाशी अप्रत्यक्ष जोड. विविध (2010-2024)

हेही वाचा: Cyber Fraud Case : गुजरातमध्ये ED ची मोठी कारवाई!; 100 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूकप्रकरणात 4 आरोपींना अटक
 

2015 मध्ये पुणे पोलिसांनी निलेश गँगच्या 13 सदस्यांना (सचिनसह) एक वर्षासाठी शहराबाहेर हद्दपार केले. हे विरोधी गँगशी वैरामुळे झाले. अतुल कुडलेच्या तक्रारीवर घायवळ टोळीतील 26 जणांवर महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई. यात खून (IPC कलम 302), खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायदा (आर्म्स अॅक्ट) आणि संघटित गुन्हे यांचा समावेश.

आरोपी निलेश घायवळ (प्रमुख आरोपी), सचिन घायवळ (त्याचा भाऊ, आरोपी क्रमांक 3), संतोष गावडे आणि इतर 24 जण.
न्यायालयीन निकाल: फेब्रुवारी 2019 मध्ये पुणे स्पेशल कोर्टाने पुराव्याअभावी सर्व 26 आरोपींना निर्दोष मुक्तता दिली. निलेश घायवळ तुरुंगातून सुटला, पण बॉम्बे हायकोर्टात अ‍ॅपील (क्रमांक 25/2014) सुरू आहे.

संबंधित केस : हे प्रकरण सचिन घायवळच्या MCOCA केसमध्येही उल्लेखित आहे, ज्यात तो आरोपी क्रमांक 3 होता.


सम्बन्धित सामग्री