लव्ह ट्रॅंगलमुळे चर्चेत आलेल्या लोहगडावरील पुण्याच्या केतन अग्रवाल या प्रकरणाला नव नवीन फाटे फुटत आहेत. याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर सखोल चौकशी आणि समोर आलेल्या तपासादरम्यान सिया आणि चेतन दोघांना पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे आता न्यायालयाने दोघांना 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यानंतर केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल मोठ्या अडचणीत सापडला आहे. आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाच्या भाऊ साहिल गोयल याला 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे याप्रकरणात हायहोल्टेज ड्रामा समोर आला आहे.
आशुतोष श्रीवास्तव हे आमचे वकील नसून विपुल दुशिंग हे आमचे वकील आहेत, त्यांना कुटुंबाने कोणतीही अधिकृत नियुक्ती दिलेली नव्हती. तसेच वकील श्रीवास्तव याने फसवणुकीने सियाची स्वाक्षरी घेतली असावी, असा दावा सियाचा भाऊ साहिल गोयल याने केला. यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे.
साहिल गोयलने खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करत सार्वजनिक माफी आणि लेखी आश्वासन देण्याचीही मागणी नोटिशीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाल्याचे दिसत आहे.