Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्ग ठरतोय लूटमार्ग! बुलढाण्यात कांद्याने भरलेला ट्रक पळवला, चालकाला बेदम मारहाण

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर लूटमारीची धक्कादायक घटना. कांद्याने भरलेला आयशर ट्रक अडवून चौघा चोरट्यांनी चालकाला मारहाण करत ट्रक पळवला. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या लूटमारीच्या घटनेत वाढ होत असतानाच, आता थेट कांद्याने भरलेला ट्रक पळवल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर प्रवास करणे सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Samruddhi Mahamarg Robbery

समृद्धी महामार्गावर आता नुकसानीचे सावट पाहायला मिळत आहेत. लुटमारी, दरोडा या घटनांची रांग लागलेली असता अजून एक घटना आता समोर आली आहे. छोट्या मोठ्या लुटमारीच्या घटनेनंतर आता थेट ट्रक पळवण्या इतपत मजल चोरट्यांनी मारली आहे. कांदा घेऊन जाणाऱ्या या ट्रकला मध्यरात्री समृद्धी महामार्गावर अडवण्यात आलं, त्यानंतर चालकाला बेदम मारहाण करून ट्रक पळवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या दिशेने कांदा घेऊन जाणारा आयशर ट्रक समृद्धी महामार्गावरून जात होता. मध्यरात्रीच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या चौघा चोरट्यांनी बुलढाणा हद्दीत हा ट्रक अडवला. चोरट्यांनी ट्रक चालक यांना बेदम मारहाण केली आणि कांद्याने भरलेला ट्रक घेऊन पसार झाले. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेतच चालकाने डोणगाव पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू केला आहे.

Duronto Express: दुरंतो एक्स्प्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक; तीन डब्यांच्या काचा फुटल्या,प्रवासी…

समृद्धी महामार्ग ठरतोय लूटमार्ग?
यापूर्वीही समृद्धी महामार्गावर वाहन अडवून लूटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. छोट्या-मोठ्या लुटीनंतर आता थेट ट्रकच पळवल्याने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version