Sanjeev Sonawane Death: शेजाऱ्यांकडून कुलूप उघडून घरात प्रवेश केला अन्… बहिणीच्या डोळ्यांसमोर दिसलं भयंकर दृश्य

संजीव सोनवणे हे घरात एकटेच वास्तव्याला होते. सोमवारी रात्रीच्या जेवणानंतर त्यांनी स्वतःच्या सांगण्यावरून शेजाऱ्यांकडून घराला बाहेरून कुलूप लावून घेतले होते.

Sanjeev Sonawane Death: शेजाऱ्यांकडून कुलूप उघडून घरात प्रवेश केला अन्… बहिणीच्या डोळ्यांसमोर दिसलं भयंकर दृश्य

Sanjeev Sonawane Death: लातूर येथील नामांकित शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय 67) यांनी आपल्या राहत्या घरी पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून आपलं आयुष्य संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पद्मानगर भागातील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी (15 सप्टेंबर) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी सापडलेल्या अंतिम चिठ्ठीमध्ये "मी स्वतःच्या इच्छेने हे पाऊल उचलत असून, माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये आणि याप्रकरणी कोणतीही चौकशी केली जाऊ नये," असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कुलूप उघडल्यानंतर उघडकीस आला प्रकार 

संजीव सोनवणे हे घरात एकटेच वास्तव्याला होते. सोमवारी रात्रीच्या जेवणानंतर त्यांनी स्वतःच्या सांगण्यावरून शेजाऱ्यांकडून घराला बाहेरून कुलूप लावून घेतले होते. मंगळवारी सकाळी त्यांची बहीण मुंबईवरून लातूर येथे आल्यानंतर कुलूप उघडून आत प्रवेश केला असता, सोनवणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक, पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे आणि फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

अमेरिकेतून नातेवाईक आल्यावर होणार अंत्यसंस्कार 

संजीव सोनवणे यांनी 'श्री चंद्रभानू सोनवणे महाविद्यालया'च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य केले होते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या उत्कृष्ट निकालांमुळे त्यांच्या संस्थेने अल्पावधीतच मोठी ख्याती मिळवली होती. मात्र, मुलगा आणि इतर कुटुंबीय अमेरिकेत (कॅलिफोर्निया) वास्तव्याला असल्याने सोनवणे काही काळापासून अत्यंत एकाकी पडले होते. 

हेही वाचा – Mumbai Fire: मुंबईत मोठी दुर्घटना! 'नामांकित' रुग्णालयात सिलिंडरचा भीषण स्फोट; 2 कर्मचारी होरपळले

याच एकाकीपणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतून कुटुंबीय परतल्यानंतरच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार असून, 17 सप्टेंबरपर्यंत त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number