Shirdi Crime : शिर्डी साई संस्थान प्रशासनात मोठा घोटाळा उघड; 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

साई संस्थानच्या अखत्यारीत असणाऱ्या साई आश्रममधील 77 लाख 13 हजारांहून अधिक रकमेचे विद्युत साहित्य चोरी करून अपहार केल्याप्रकरणी 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirdi Crime : शिर्डी साई संस्थान प्रशासनात मोठा घोटाळा उघड; 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

शिर्डी: शिर्डीतील प्रसिद्ध साई संस्थान प्रशासनातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साई संस्थानच्या अखत्यारीत असणाऱ्या साई आश्रममधील 77 लाख 13 हजारांहून अधिक रकमेचे विद्युत साहित्य चोरी केल्याप्रकरणी 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा: Shivsena : अनेक ठिकाणी महायुती स्वबळावर लढणार; शिंदेंच्या आमदाराचे वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या तक्रारीवरून उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. 2022 मध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्र. 0936/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 379,381,408,409,465,467,471 आणि 120-B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भरती यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number