धुळे जिल्ह्यात हृदयद्रावक घटना! पायाला लोखंडी साखळी अन् कुलूप लावून नवविवाहित दांपत्याची तापी नदीत उडी

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी या दांपत्याने एकमेकांच्या पायांना लोखंडी साखळी गुंडाळून त्याला कुलूप लावले होते, जेणेकरून पाण्यातून वाचण्याचा किंवा बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही.

धुळे जिल्ह्यात हृदयद्रावक घटना! पायाला लोखंडी साखळी अन् कुलूप लावून नवविवाहित दांपत्याची तापी नदीत उडी
newlywed couple end life

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सावळदे परिसर एका अत्यंत सुन्न करणाऱ्या घटनेने हादरून गेला आहे. येथील तापी नदीच्या पात्रात एका नवविवाहित पती-पत्नीचे मृतदेह अत्यंत धक्कादायक स्थितीत तरंगताना आढळून आले. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी या दांपत्याने एकमेकांच्या पायांना लोखंडी साखळी गुंडाळून त्याला कुलूप लावले होते, जेणेकरून पाण्यातून वाचण्याचा किंवा बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख पटली असून, 28 वर्षीय श्याम हरी पाटील आणि त्यांची 20 वर्षांची पत्नी सपना पाटील अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील रहिवासी असून, सध्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे राहत होते.

प्रेमविवाहानंतर टोकाचे पाऊल

स्थानिक नागरिकांना तापी नदीत दोन मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. नरडाणा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक आपत्कालीन पथकाच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केले. प्राथमिक माहितीनुसार, श्याम आणि सपना यांनी काही काळापूर्वीच प्रेमविवाह केला होता. मात्र, संसार सुरू असतानाच त्यांनी एवढे अत्यंत कठोर आणि टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले? त्यामागे काही कौटुंबिक कलह होता, आर्थिक अडचणी होत्या की अन्य काही वाद? याचा शोध घेण्यासाठी नरडाणा पोलिसांनी विविध कोनातून सखोल तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – मंत्रालयातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याला मॅट्रिमोनिअल साईटवरून 18 लाखांचा गंडा; भामट्यांविरोधात गुन्हा दाखल

सावळदे पूल बनतोय ‘सुसाइड पॉईंट’

दरम्यान, सावळदे येथील तापी नदीचा पूल जीवन संपवण्याच्या घटनांमुळे कुप्रसिद्ध होत चालल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व चिंता व्यक्त केली आहे. या पुलावरून उड्या मारून जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने हा पूल ‘सुसाइड पॉईंट’ ठरत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने या पुलाच्या दोन्ही बाजूने उंच संरक्षक जाळ्या उभाराव्यात, सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवावेत आणि 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करावेत, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number