रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या एका शिवप्रेमी पर्यटकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे गडावर आलेल्या पर्यटकांसह मृत व्यक्तीच्या कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लघुशंकेला जाताना घडला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पर्यटकाचे नाव दीपक शंकर गोसावी असे असून ते सातारा येथील रहिवासी होते. दीपक गोसावी हे आपल्या जवळच्या काही मित्रमंडळींसोबत रायगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. गडभ्रंमती कत असताना ही संपूर्ण दुर्घटना घडली.
दीपर गोसावी हे मित्रांसोबत फिरत असताना लघुशंकेसाठी जात होते. याच दरम्यान त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. याच दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना वाचवण्यासाठी तातडीने घटनास्थळावरील लोकांनी मदतकार्य सुरु केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
शिवप्रेमी पर्यटकाचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि दीपक गोसावी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डोलीच्या सहाय्याने दीपक गोसावी यांचा मृतदेह हा गडावरुन खाली आणण्यात आला. या घटनेची माहिती महाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या दुर्घटने प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.