Crime : भरदिवसा रस्त्यावरुन स्कूटीवर जात असलेल्या तरुणीसोबत अचानक घडलेल्या एका प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली. रस्त्यावरची नेहमीची वर्दळ आणि त्यातच मागून आलेल्या एका तरुणाने केलेल्या कृत्याने अवघ्या काही क्षणांतच परिस्थिती भयंकर झाली. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुनच पळ काढला. मात्र, पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेत काही वेळात त्याला बेड्या ठोकल्या.
नक्की घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील सतना शहरात 24 सप्टेंबर रोजी साधारण सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलेक्ट्रेट गेटजवळ तरुणी आली असता स्कूटीवरुन जात होती. या दरम्यान तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तरुणाीला काही क्षण नेमकं कायं घडलं,हेही समजू शकलं नाही. या हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. संबंधित तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून,सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरु केला. घटनास्थळाजवळील सर्व परिसरात बंदोबस्त वाढवून आरोपींचा माग काढला. हल्लानंतर फक्त आणि फक्त दीड तासामध्येच टिकुरिया टोला परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली.
हल्ल्याचं कारण आलं समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने नाव सागर उर्फ सूरज जाटव असे आहे. आरोपी आणि पीडित तरुणी यांच्या दोन वर्षांपासून बोलणं सुरु होते. तर दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध ही असल्याचे समोर आले आहे.मात्र, गेल्या काही दिवसांपासून तरुणीने आरोपीशी बोलणं बंद केलं होतं.या कारणावरुन आरोपी तरुणीवर नाराज होता. याच रागातून तरुणाने 24 सप्टेंबर रोजी तरुणीवर चाकून हल्ला केलाय.सध्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आलेली आहे.