CRIME : ‘लेकरं माझी गेली गं’! एकाच चितेवर जुळ्या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार; फरशीवरील ‘ती’ गोष्ट ठरली मृत्यूचं कारण

घरातील प्रत्येकजण हे चिमुकल्यांच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करत राहतात. पण, लहान मुलांकडे चुकून झालेलं दुर्लक्ष कधी भयंकर घटनेत बदलेले हे कधीच सांगता येत नाही.

CRIME : ‘लेकरं माझी गेली गं’! एकाच चितेवर जुळ्या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार; फरशीवरील ‘ती’ गोष्ट ठरली मृत्यूचं कारण

घरात लहान मुलं आली की घर आनंदाने भरून जातं आणि सगळं वातावरणच बदलून जातं. घरातील प्रत्येकजण हे चिमुकल्यांच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करत राहतात. पण, लहान मुलांकडे चुकून झालेलं दुर्लक्ष कधी भयंकर घटनेत बदलेले हे कधीच सांगता येत नाही. सध्या अशी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं एक वर्षांच्या जुळ्या चिमुकल्याकडे झालेले दुर्लक्ष हे अत्यंत हृदयद्रावक घटनेत बदलेलं असून ज्यात दोघांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. 

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील आदिमाली येथील वलाराकारा या परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली.  पीडित कुटुंब हे आपल्या दोन चिमुकल्यांसह या परिसरात वास्तव्यास होती. शुक्रवारी घरातील प्रत्येकजण आपआपल्या कामात होती आणि ही चिमुकली घरात खेळत होती. दोघंही न रडता घरात खेळत असल्याने त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेलं नाही. मात्र पुढे असं काही होईल, याची कल्पना एकानेही केली नाही.

हेही वाचा-Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात मोठी घडामोड! "आदित्य ठाकरेंना आताच्या आता अटक करा" दिशाच्या वडिलांची CBIकडे मोठी मागणी

शुक्रवारी रात्रीच्या वेळी चिमुकली खेळत असतानाच, केमिकलने भरलेली एक बाटली होती ती अचानक स्वयंपाकघरातील फरशीवर पडली होती. बाटली पडल्याने त्यातून सांडलेले सर्व द्रव पूर्णपणे फरशीवर सांडले होते. अवघ्या एका वर्षांच्या दोन्ही चिमुकल्यांना ते द्रव पदार्थ किती हानिकारक आहे, त्याचा अंदाजही आला नाही.

खेळता खेळता या जुळ्या भावांनी ते स्वयंपाक घरातील फरशीवर पडलेले ते द्रव  चाखले आणि त्यानंतर दोघांचीही प्रकृती गंभीररीत्या बिघडील. त्यानंतर कुटुंबीयांना त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत्य घोषित केले.अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून संताप; मेडिकलमध्ये घुसून चालकावर चाकूने वार, दोघांना अटक

पोलिसांना कुणावर संशय?
या घटनेनंतर आदिमाली पोलिसांनी मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. घटनास्थळी जाऊन झडती घेतल्यानंतर पोलिसांना स्वयंपाकघरातून पेंट थिनरची एक बाटली आणि किटकनाशकाची एक बाटली आढळून आली. चिमुकल्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून तपासणी अहवालातून त्यांचा मृत्यू केमिकल चाखल्यामुळेच झाला होता का, हे स्पष्ट होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number