Wednesday, July 09, 2025 09:48:20 PM

अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची धक्कादायक घटना

अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्या अर्भकाचा मृतदेह नाशिकहून पालघरला एसटीने नेला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अर्भकाचा मृत्यू झाला होता.

अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची धक्कादायक घटना

नाशिक: अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्या अर्भकाचा मृतदेह नाशिकहून पालघरला एसटीने नेला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अर्भकाचा मृत्यू झाला होता. एसटीतून अर्भकाचा मृतदेह नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून दोन दिवसात प्रकरणाचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

पालघर जिल्ह्यातील जोगळवाडी येथील दाम्पत्याच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्हा रुग्णालयात घडली होती. दरम्यान, पित्याने अर्भकाचा मृतदेह पिशवीतून एसटीने नेल्याप्रकरणी आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: मुंबईसह ठाण्यात कुठे आणि कोणत्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार?

पालघर जिल्ह्यातल्या जोगळवाडी या आदिवासी वाडीवरील दाम्पत्य पालघर जिल्ह्यातील खोडाळा आरोग्य केंद्रात सुरुवातीला उपचारासाठी गेले होते. तिथेच त्या बाळाचे ठोके लागत नसल्याचे लक्षात आल्याने तिथून त्या गर्भवती महिलेला अत्यवस्थ अवस्थेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले होते. मात्र, त्या बाळाचा मृत्यू झाला होता. पित्याने तो मृतदेह पिशवीत घालून एसटीतून पालघर जिल्ह्यातील गावी नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळेच या प्रकरणी आरोग्य उपसंचालकांनी चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीच्या अहवालातून काय समोर येते. यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री