New Cyber Fraud: फोन उचलला पण समोरून शांतता…; Silent Calls म्हणजे सायबर स्कॅमर्सचा नवीन डाव?

मोबाईलवर येणारे Silent Calls हे तांत्रिक बिघाड नसून सायबर फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो. कॉल उचलल्याने नंबर अ‍ॅक्टिव्ह असल्याची खात्री स्कॅमर्सना मिळते.

New Cyber Fraud: फोन उचलला पण समोरून शांतता…; Silent Calls म्हणजे सायबर स्कॅमर्सचा नवीन डाव?

नवी दिल्ली: तुमच्या मोबाईलवर अचानक एखादा अनोळखी नंबर झळकतो. तुम्ही कॉल उचलता… पण समोरून एक शब्दही ऐकू येत नाही. काही सेकंदांनी कॉल कट होतो. तुम्हाला वाटतं, कदाचित नेटवर्कचा प्रश्न असेल. पण थांबा… हा कॉल चुकून आलेला नसून सायबर फसवणुकीचा पहिला प्रयत्न असू शकतो. गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांना अशा Silent Calls येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या कॉलमध्ये समोरून कोणताही आवाज नसतो, पण यामागे स्कॅमर्सचा अत्यंत धोकादायक उद्देश लपलेला असतो.

हा तांत्रिक बिघाड नसून डेटा चोरी आणि भविष्यातील फसवणुकीची नांदी असल्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. लोकांकडून आलेल्या वाढत्या तक्रारीनंतर दूरसंचार विभागाने स्वतः सतर्कतेचा इशारा दिला आहे. विभागाने स्पष्ट केलं आहे की हे सामान्य कॉल नसून, स्कॅमर्स Silent Calls च्या माध्यमातून तुमचा मोबाईल नंबर अ‍ॅक्टिव्ह आहे की नाही, हे तपासण्याचा प्रयत्न करत असतात.

हेही वाचा: Digital Arrest Scam: फोनवर पोलीस, स्क्रीनवर कोर्ट…; कोल्हापुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 78.90 लाखांचा घोटाळा

एकदा तुम्ही कॉल उचलला, की तुमचा नंबर त्यांच्या यादीत ‘अ‍ॅक्टिव्ह’ म्हणून नोंदवला जातो. याच ठिकाणी अनेक जण मोठी चूक करतात. कॉलमध्ये आवाज न आल्यामुळे परत कॉल करण्याचा मोह होतो. पण हाच क्षण स्कॅमर्ससाठी संधी असतो. परत कॉल केल्यास तुमच्यावर महागडे चार्जेस लागू शकतात, तुमची वैयक्तिक माहिती ट्रॅक होऊ शकते किंवा पुढील फसवणुकीसाठी तुम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं.

दूरसंचार विभागाने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की असा Silent Call आला, तर तो पुन्हा कॉल करू नका. शांतपणे कॉल कट करा आणि त्वरित त्याची तक्रार नोंदवा. जागरूकता हाच या सायबर सापळ्याविरोधातील सर्वात मोठा बचाव आहे. Silent Calls किंवा अशा संशयास्पद कॉल्सची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने अधिकृत व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. www.sancharsaathi.gov.in या वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावर Citizen Centric Services या विभागावर भेट द्या. तेथे Chakshu हा पर्याय आहे, तो निवडा. पुढे Malicious Web Links Report, Fraud Report किंवा Spam Report असे पर्याय दिसतील. योग्य पर्याय निवडून आवश्यक माहिती भरा. माहिती सबमिट केल्यानंतर तिथे तक्रार नोंदवली जाईल.

लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार आवाज न करता हल्ला करतात. Silent Calls हा त्यांचा फसवणुकीचा पहिला डाव असू शकेल . त्यामुळे असा कॉल आला, तर दुर्लक्ष करू नका, पण घाबरूही नका. सतर्क रहा, योग्य तक्रार करा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. एक कॉल silent असू शकतो… पण त्यामागचा धोका मोठा ठरू शकेल.

हेही वाचा: IPL Auction 2026 Sold Unsold Players Full List : आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! Sold-Unsold खेळाडूंची संपुर्ण यादी पाहा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number