प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; कुख्यात गँगस्टर टोळीने स्वीकारली जबाबदारी

या हत्येच्या सूत्रधारावर पंजाब, चंदीगड आणि कॅनडामधील व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल करणे, हत्या व गोळीबार घडवून आणणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; कुख्यात गँगस्टर टोळीने स्वीकारली जबाबदारी
Mad Sandhu

Mad Sandhu Killed in Punjab: पंजाबमधील अमृतसर येथे सोशल मीडिया विश्वात लोकप्रिय असलेला इन्फ्लुएन्सर ‘मॅड संधू’ याची भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारी ADCP वेनिला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शनिवारी रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लोहारका रोडवर घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी संधूला अचानक गाठून त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संधूला उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

यूकेत लपलेल्या गोल्डी ढिल्लो अन् जग्गा तरनतारनने घेतली हत्येची जबाबदारी
या हत्याकांडानंतर अवघ्या काही वेळातच कुख्यात गँगस्टर गोल्डी ढिल्लो आणि जग्गा तरनतारन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. पंजाब पोलीस सूत्रांनुसार, यातील मुख्य सूत्रधार गुरप्रीत सिंग उर्फ गोल्डी ढिल्लो हा सध्या UK (ब्रिटन) मध्ये लपून बसला असून तो कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारचा अत्यंत जवळचा साथीदार मानला जातो. पंजाब, चंदीगड आणि कॅनडामधील व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल करणे, हत्या व गोळीबार घडवून आणणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. हत्येमागील मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक विशेष पथके तपास करत आहेत.

हेही वाचा – अवघ्या 2 मिनिटांत 15 वार, मग छातीवर बसून…; जेलमधून परतलेल्या पतीचं पत्नीसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

कायदा आणि सुव्यवस्थेवरून काँग्रेसचा आप सरकारवर जोरदार हल्लाबोल
या घटनेमुळे संपूर्ण अमृतसर परिसरात घबराटीचे सावट पसरले असून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. राजकुमार वेरका यांनी या हत्याकांडावर तीव्र संताप व्यक्त करत राज्यातील सत्ताधारी आम आदमी पार्टी (AAP) सरकारवर जोरदार निशाणा साधला. अमृतसरसारख्या शहरात भरदिवसा गोळीबार होऊन नागरिक आपला जीव गमावत असल्याने पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सर्वसामान्य जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध तीव्र
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळावरील आणि आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे सुगावा हाती लागल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा – आईसोबत मामाच्या गावी गेला अन् घरातल्यांसोबत तरुणाने…; 5 वर्षीय चिमुकलीलाही सोडलं नाही; अख्खं गाव हादरलं

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number