काही महिन्यांपूर्वी मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीही लहान मुलावर आली होती. मात्र, एका विवाहित महिलेच्या प्रेमात अडकलेल्या या तरुणाने आपल्याच वडिलांना रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने धक्कादायक कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्या मोठी खळबळ उडाली आहे. नेमका या प्रकरणाता उलगडा कसा झाला आणि कट कसा रचला गेला? ज्या वयात आई-वडिलांचा सांभाळ करुन कुटुंबाची थोडी जबाबदारी घ्यायची, त्याच वयात या तरुणाकडून असा प्रकार कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या गयाजी जिल्ह्यात एका वडिलांची त्यांच्याच मुलाने अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली आहे. चंदन असे आरोपी मुलाचे नाव तर कृष्णा गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव असून कृष्णा हे चंदन गुप्ता याचे वडिल होते.
नेमकं का असे केले?
आरोपी मुलगा चंदन याचे ते जिथं राहत होते त्याच गल्लीतील एका विवाहित महिलेसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संबंधित महिला चंदनकडून वारंवार पैसे उकळत होते तर त्याची जमीन ही आपल्या नावावर करुन घेण्यासाठी चंदनवर अनेक वेळा दबाव टाकत होती, अशी माहिती समोर येत आहे. चंदन आणि विवाहित महिलेच्या अनैतिक संबंधांना आणि जमिनीच्या व्यवहाराला कृष्णा यांच्याकडून विरोध होतो. त्यामुळे आपल्याच वडिलांचा काटा काढण्याचा कट चंदनने आखला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, यापूर्वीही चंदनने प्रेयसीच्या सांगण्यावरुन विष प्राशन केल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे. एवढेच नव्हे तर चंदनने आपल्या हातावर 8 वर्षांपूर्वी या विवाहित प्रेयसीचे नाव ही गोंदवून घेतले होते. याच महिलेच्या सांगण्यावरुन चंदनने आपल्याच वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. 2021 मध्ये चंदनच्या कुटुंबातील असलेल्या मोठ्या भावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल होता, त्यानंतर हाच आपल्या आई-वडिलांचा एकमेव आधार उरला होता.
डायलिसिसच्या बहाण्याने वडिलांना नेलं
24 सप्टेंबर रोजी चंदन हा वडिलांना डायलिसिससाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, असे सांगत बाहेर पडला. पण अनेक तास उलटून गेले. मात्र बाप-लेक घरी परतले नाहीत. दोन दिवसांनंतर 27 सप्टेंबर रोजी एका डोंगरावर कृष्णा गुप्ता अर्थात चंदनच्या वडिलांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी काही तांत्रिक पुरावे आणि सखोल तपासाच्या आधारे साधारण 20 दिवसांनंतर आरोपी चंदनला अटक केली असून त्याच्या प्रेयसीचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग होता की नाही याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.