Sunday, July 13, 2025 10:27:29 AM

कोलकाता पुन्हा हादरले! लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; 3 जणांना अटक

कसबा येथील कॉलेजच्या परिसरात झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या संदर्भात कोलकाता पोलिसांनी दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि दोन विद्यमान विद्यार्थ्यांसह तीन जणांना अटक केली आहे.

कोलकाता पुन्हा हादरले लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार 3 जणांना अटक
Edited Image

कोलकाता: दक्षिण कोलकात्यातील कसबा लॉ कॉलेजमधील कायद्याच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. कसबा येथील कॉलेजच्या परिसरात झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या संदर्भात कोलकाता पोलिसांनी दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि दोन विद्यमान विद्यार्थ्यांसह तीन जणांना अटक केली आहे. ही घटना 25 जून रोजी संध्याकाळी 7.30 ते 10.50 च्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण शहर हादरले होते. आता पुन्हा कोलकातामध्ये विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे.   

पीडितेकडून दाखल केलेल्या तक्रारीनंतर कसबा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.  आरोपींमध्ये कॉलेजचे माजी युनिट अध्यक्ष मोनोजित मिश्रा (31), झैब अहमद (19) आणि प्रमित मुखर्जी (20) यांचा समावेश आहे. मिश्रा आणि अहमद या दोघांना 26 जून रोजी संध्याकाळी कोलकाता येथील तलबागन क्रॉसिंगजवळील सिद्धार्थ शंकर शिशु रॉय उद्यानाच्या समोरून अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तिसऱ्या आरोपी मुखर्जीला 27 जून रोजी अटक करण्यात आली. 

हेही वाचा - महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याने भाजपा पदाधिकारी अटकेत, चित्रा वाघ यांचा संताप

कॉलेज कर्मचाऱ्यांसह 3 जणांना अटक - 

प्राप्त माहितीनुसार, कथित घटना कॉलेजच्या इमारतीतच घडली. पीडितेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कथित गुन्ह्याचे ठिकाण सुरक्षित करण्यात आले असून फॉरेन्सिक तपासणीची वाट पाहत आहे. तिघेही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. 

हेही वाचा - नागपूरात देहव्यापाराचा धंदा चालवणाऱ्या बापलेकाला अटक 

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये या घटनेचे वर्णन भयानक असे केले आहे. मालवीय यांनी म्हटलं आहे की, हा गुन्हा महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थी आणि दोन कर्मचाऱ्यांनी केला आहे आणि त्यात एक टीएमसी सदस्यही सामील असल्याचा आरोप केला आहे.
 


सम्बन्धित सामग्री