NEET 2026 Paper Leak Case : शिक्षक, डॉक्टर अन् ब्युटी पार्लर… NEET पेपरफुटीच्या कट नेमका कसा रचण्यात आला? धक्कादायक माहिती समोर

परीक्षा आयोजित करणाऱ्या 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'च्या (NTA) अंतर्गत समितीवर कार्यरत असणाऱ्या तीन विषयतज्ज्ञांनीच विश्वासघात करत या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.<br/>

NEET 2026 Paper Leak Case : शिक्षक, डॉक्टर अन् ब्युटी पार्लर… NEET पेपरफुटीच्या कट नेमका कसा रचण्यात आला? धक्कादायक माहिती समोर

NEET 2026 Paper Leak Case : देशभरातील वैद्यकीय शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या ‘नीट 2026’ प्रवेश परीक्षेत झालेला मोठा गैरव्यवहार केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) समोर आणला आहे. न्यायालयासमोर मांडलेल्या विस्तृत दोषारोपपत्रातून या संपूर्ण षड्यंत्राचा उलगडा झाला आहे. परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (NTA) अंतर्गत समितीवर कार्यरत असणाऱ्या तीन विषयतज्ज्ञांनीच विश्वासघात करत या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अशा प्रकारे रचला गेला कट

गोपनीय विभागाचा ताबा असलेल्या या तीन तज्ज्ञांनी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका बाहेर काढल्या. यासाठी अत्यंत चलाखीने कागदाचे तुकडे, राहत्या घरी जाऊन स्मरणशक्तीच्या आधारे प्रश्न लिहून काढणे अशा मार्गांचा वापर केला गेला. हे प्रश्न पुढे दलाल, विविध शहरांतील खासगी शिकवणी वर्गांचे मालक आणि मध्यस्थांच्या जाळ्याद्वारे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून मोठा आर्थिक व्यवहार करण्यात आला.

विषयानुसार प्रश्नपत्रिकांचा झालेला प्रवास

भौतिकशास्त्र: या विषयाच्या तज्ज्ञ मनिषा हवालदार यांनी प्रश्नपत्रिकांच्या भाषांतर व पडताळणीच्या कामादरम्यान दिल्लीतील एनटीए कार्यालयातून बाहेर पडल्यावर प्रश्न आठवून लिहून काढले. हे प्रश्न त्यांनी पुण्यातील एका नामांकित शिकवणी वर्गातील शिक्षक तेजस शाह यांच्याकडे सुपूर्द केले.

जीवशास्त्र: जीवशास्त्र विषयाच्या जबाबदार तज्ज्ञ मनिषा मांढरे यांनी पुण्यातील मनिषा वाघमारे या मध्यस्थास प्रश्न पुरवले. वाघमारे यांनी हे प्रश्न धनंजय लोखंडे व शुभम खैरनार यांच्यामार्फत हरियाणातील गुरुग्राम येथील यश यादवपर्यंत पोहोचवले. तिथून पुढे जयपूरमधील मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल आणि विकास बिवाल यांच्या सिंडिकेटद्वारे हे संच वितरित झाले.

रसायनशास्त्र: रसायनशास्त्राचे तज्ज्ञ प्रल्हाद कुलकर्णी यांनी कच्चे काम करण्याच्या बहाण्याने कागदाच्या छोट्या कपट्यांवर प्रश्न आणि उत्तरे टिपली. नंतर दिल्लीतील हॉटेलमध्ये त्यांनी इतर प्रश्नांची टाचणे तयार केली. हे प्रश्न दोन वेगळ्या मार्गांनी पुढे पाठवले गेले. एका मार्गात मनिषा वाघमारे यांचा सहभाग होता, तर दुसऱ्या मार्गात लातूरचे डॉक्टर मनोज शिरुरे यांनी हे प्रश्न लातूर येथील आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – Jalna Crime: नसरापूरनंतर जालन्यातही जलद न्याय; 3 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाचा 57 दिवसांत निकाल, आरोपीला जन्मठेप

पुराव्यांची साखळी आणि मध्यस्थांचे जाळे

हस्तलिखित नोंदी, तांत्रिक पुरावे आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे धागेदौरे जोडत सीबीआयने या राष्ट्रीय स्तरावरील नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीच्या केंद्रीय कार्यालयापासून सुरू झालेली ही साखळी पुणे, लातूर, हरियाणा आणि जयपूरपर्यंत पसरली होती. या धक्कादायक वास्तवामुळे संपूर्ण देशातील शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number