Thane Crime : ठाण्यात एएसआय लाच घेताना अटकेत; वडाळा टीटी ठाण्यातील दोन अधिकारीही ACB च्या जाळ्यात

ठाण्यात एसीबीने मोठी कारवाई करत मुंब्रा पोलिस ठाण्यातील एएसआय शशिकांत भालेराव यांना 25 हजारांची लाच घेताना अटक केली.

Thane Crime : ठाण्यात एएसआय लाच घेताना अटकेत; वडाळा टीटी ठाण्यातील दोन अधिकारीही ACB च्या जाळ्यात

महाराष्ट्रातील लाचलुचपतविरोधी विभागाने (ACB) शुक्रवारी मोठी कारवाई केली. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लक्ष्मण भालेराव (49) यांना 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भालेराव यांनी एका फिर्यादीकडून जप्त केलेली स्कूटर परत देण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला 50 हजारांची मागणी केली होती. चर्चेनंतर ही रक्कम 25 हजारांवर आली. एसीबीने सापळा रचून त्यांना लाच घेताना पकडले. भालेराव यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईत आणखी एका प्रकरणात एसीबीने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाळ्यात पकडलं. वडाळा ट्रक टर्मिनल (WTT) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे (52) आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना तक्रारदाराकडून लाच घेताना अटक करण्यात आली.

या प्रकरणात तक्रारदाराचा समुदाय सभागृहावरून झालेल्या वादानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वाघमोडे यांनी तक्रारदाराला मदतीसाठी 50 हजार रुपये मागितले, तर सरोदे यांच्यासाठी तब्बल 5 लाखांची मागणी केली गेली होती. अखेर चर्चेनंतर सरोदे यांच्या वाट्याची मागणी 4 लाखांवर आणण्यात आली. याच पार्श्वभूमीवर एसीबीने सापळा रचला आणि सरोदे यांना 2 लाख रुपये, तर वाघमोडे यांना 30 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिस दलातील अशा भ्रष्टाचाराच्या घटनांवर कठोर कारवाई सुरू राहील. आरोपींविरोधात पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number