ठाणे हादरलं! ठाकरे गटाचा नेता ठार; रात्री भररस्त्यात गोळ्या झाडून संपवलं

ठाण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.
Thane Crime
Pradeep Purnekar

ठाण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना काल रात्री मानपाडा परिसरातील गणेश नगर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पुर्णेकर हे त्यांच्या कार्यालयासमोर असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपींमध्ये 3 ते 4 जणांचा समावेश असल्याचे सिसिटीव्ही फुटेज मधून समोर येत आहे. त्यांच्यावर 4 वेळा गोळ्या झाडल्या असून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा – अमरावतीत कॉलेज कॅम्पसमध्ये थरार! विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकूने वार; भरदुपारी घडलेल्या घटनेने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version