Ketan Agrawal Death : ‘… म्हणून 3 वर्ष थांबून लग्न करायचं होतं’; संशय टाळण्यासाठी सिया-चेतनच्या धक्कादायक प्लानबद्दल मोठा खुलासा

आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ हत्येचा कट रचला नव्हता, तर गुन्ह्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून कसे सुटायचे, याचे हुशारीने नियोजन केले होते.

Ketan Agrawal Death : ‘… म्हणून 3 वर्ष थांबून लग्न करायचं होतं’; संशय टाळण्यासाठी सिया-चेतनच्या धक्कादायक प्लानबद्दल मोठा खुलासा

Ketan Agrawal Death : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन आणि थरारक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ हत्येचा कट रचला नव्हता, तर गुन्ह्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून कसे सुटायचे, याचे हुशारीने नियोजन केले होते. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे या दोघांचा हा गुप्त कट उघडकीस आला आहे.

कटानंतर लगेच विवाह न करण्याचा घेतला होता निर्णय
केतनचा संपवल्यानंतर त्यांनी तातडीने लग्न केले, तर पोलीस आणि नातेवाईकांना त्यांच्यावर संशय येईल, याची सिया आणि चेतनला पूर्ण कल्पना होती. याच कारणामुळे त्यांनी कटानंतर लगेचच एकत्र न येता, पुढील 2 ते 3 वर्षे थांबून मगच विवाह बंधनात अडकण्याचे ठरवले होते. डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी व्हॉट्सॲपवरील कोणते संवाद पुसून टाकायचे आणि कोणते सुरक्षित ठेवायचे, याचे नियोजन त्यांनी आधीच केले होते. त्यानुसार त्यांनी मोबाईलमधील डेटा हाताळला होता.

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना मिळाले यश
आरोपींचा हा संपूर्ण प्रकार घातपात नसून केवळ एक अपघात आहे, असा भासवण्याचा प्रयत्न होता. अटकेत असतानाही ते पोलिसांची दिशाभूल करत राहिले. परंतु, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला. तपास पथकाने संशयितांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR), मोबाईल लोकेशन आणि त्यांच्या भेटीगाठींची माहिती गोळा केली. या ठोस तांत्रिक पुराव्यांमुळे पोलिसांना या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले.

दरम्यान, ज्या व्यक्तीशी विवाह निश्चित झाला होता, त्याचा इतक्या निर्घृणपणे जीव घेऊनही मुख्य संशयित सिया गोयल हिच्या मनात कोणताही पश्चात्ताप दिसून आलेला नाही. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्याचा पर्दाफाश होऊन अटक झाल्यानंतरही सिया पोलीस कोठडीत एकदाही भावूक झाली नाही किंवा रडली नाही. तिच्या चेहऱ्यावर भीती किंवा दुःखाचे कोणतेही भाव नसल्याने तपास अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी पोलीस आता अधिक वेगाने तपास करत आहेत.

गुन्ह्याचे स्वरूप समजण्यासाठी डमी पुतळ्याचा वापर
या भयानक घटनेची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस पथक एका मानवी आकाराच्या डमी पुतळ्यासह लोहगड किल्ल्यावर पोहोचले होते. केतन अग्रवाल याला दरीत नेमके कसे ढकलण्यात आले, याचा क्रम समजून घेण्यासाठी या पुतळ्याची मदत घेण्यात आली. संशयित सिया गोयल हिच्या समोरच पोलिसांनी कड्यावरून तो पुतळा खाली टाकून संपूर्ण घटनेचे प्रात्यक्षिक केले.

हेही वाचा – Ketan Agarwal Death Case: 'सियाचा एक इशारा अन् चेतनचा धक्का…'; पोलिसांनी 400 फूट उंचीवरून डमी फेकून उघड केला लोहगड किल्ल्यावरील 'त्या' भयावह योजनेचा कट

तथापि, रविवारी पोलीस पथक सिया गोयलला घेऊन लोहगडावर दाखल झाले होते. सुमारे अडीच तास म्हणजेच सकाळी 10:30 वाजेपर्यंत घटनास्थळी ही तपास प्रक्रिया सुरू होती. या मोहिमेदरम्यान अत्यंत गुप्तता आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तपास पूर्ण होईपर्यंत लोहगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.   
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number