Jalgaon Crime : मुलगा हवा होता, पण चौथीही मुलगीच झाली ! निर्दयी बापाने 3 दिवसांच्या लेकीला लाकडी पाटाने ठेचून संपवलं

मुलगा झाला नाही या कारणावरून संतापलेल्या बापाने आपल्या अवघ्या 3 दिवसांच्या मुलीला डोक्यात लाकडी पाट मारून संपवलं.

Jalgaon Crime : मुलगा हवा होता, पण चौथीही मुलगीच झाली ! निर्दयी बापाने 3 दिवसांच्या लेकीला लाकडी पाटाने ठेचून संपवलं

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मुलगा झाला नाही या कारणावरून संतापलेल्या बापाने आपल्या अवघ्या 3 दिवसांच्या मुलीला डोक्यात लाकडी पाट मारून संपवलं. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून पहूर पोलिसांनी आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे नेमंक प्रकरण ?

आरोपी कृष्णा लालचंद राठोड (26) याला आधीच तीन मुली होत्या. त्याला मुलगा व्हावा अशी तीव्र इच्छा होती, मात्र त्याच्या पत्नीने चौथीलाही मुलीलाच जन्म दिला. या गोष्टीचा कृष्णाला इतका राग आला की, त्याने घरात असलेल्या लाकडी पाटाने चिमुरडीच्या डोक्यावर प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात त्या निष्पाप जीवाचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – Cyber Scam Alert: सावधान! ट्रॅफिक चलान भरण्याच्या नादात सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू नका, नेमका काय आहे प्रकार ?

अपघाताचा बनाव फसला; पोलिसांनी उघड केले गुपित

घटनेनंतर कुटुंबीयांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. आंघोळ घालताना मुलगी हातातून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला, असा बनाव त्यांनी रचला होता. सुरुवातीला 'अकस्मात मृत्यू' म्हणून नोंद झाली, मात्र शवविच्छेदन अहवालात (Post-mortem report) मुलीच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खाकी दाखवताच आरोपी कृष्णाने आपला गुन्हा कबूल केला.

हेही वाचा – Raigad Crime News: रायगड हादरले! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं; सकाळच्या सुमारास घडला थरार

पोलीस बनले फिर्यादी

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, पोटच्या मुलीला संपवल्यानंतर कुटुंबातील एकही सदस्य तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हता. अखेर माणुसकी जपत पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन कृष्णा राठोड विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number