Nagpur Missing Family : नागपुरातून गायब झालेले ते कुटुंब अखेर 10 दिवसांनी सापडलं; धक्कादायक कारण आलं समोर

गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असलेले हे कुटुंब पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात सुखरूप असल्याचे तपासात समोर आले आहे.

Nagpur Missing Family : नागपुरातून गायब झालेले ते कुटुंब अखेर 10 दिवसांनी सापडलं; धक्कादायक कारण आलं समोर

Nagpur Missing Family: नागपूरच्या धंतोली भागातून अचानक गायब झालेल्या एकाच कुटुंबातील 5 सदस्यांचा गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असलेले हे कुटुंब पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात सुखरूप असल्याचे तपासात समोर आले आहे. जितेंद्र परसवानी हे आपल्या आई, पत्नी आणि मुलांसह 24 जून रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. संपूर्ण कुटुंब अचानक संपर्काबाहेर गेल्याने परिसरात कमालीची खळबळ उडाली होती आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते.

हेही वाचा – Ramesh Mhatre Arrest: डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी अपडेट; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 24 तासांनंतर अटक

मोबाईल लोकेशनवरून लागला माग; पोलिसांचा तातडीने तपास

जितेंद्र यांच्या काकांनी हे सर्वजण बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, या कुटुंबाचे शेवटचे मोबाईल लोकेशन पुणे दाखवत होते. त्या दिशेने तपास करत धंतोली पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली आणि अखेर पिंपरी-चिंचवडमधून या 5 जणांना शोधून काढले. पोलिसांनी या सर्व सदस्यांचे अधिकृत जबाब नोंदवले आहेत.

कर्जाच्या विळख्यामुळे टोकाचे पाऊल?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब कोणत्याही संकटात सापडून नव्हे, तर स्वतःच्या इच्छेने नागपूर सोडून पुण्याला गेले होते. या कुटुंबातील एका सदस्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज झाले होते, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर येत आहे. याच कर्जाच्या डोंगराला आणि मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. सर्व सदस्य सुरक्षित असल्याने पोलिसांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number