TET Paper Leak Update : TET पेपरफुटीचं महाराष्ट्रातील पहिल कनेक्शन समोर! विशेष पथकाची मोठी कारवाई; खासगी अकॅडमी चालकाला अटक

एकीकडे नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर सर्वत्र गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात नवे धागेदोरे समोर आले आहेत.

TET Paper Leak Update : TET पेपरफुटीचं महाराष्ट्रातील पहिल कनेक्शन समोर! विशेष पथकाची मोठी कारवाई; खासगी अकॅडमी चालकाला अटक

भारतातील विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या अनेक प्रकरणांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. एकीकडे नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर सर्वत्र गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात नवे धागेदोरे समोर आले आहेत. भिवंडी येथे TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास भिवंडी पोलिसांचे विशेष पथक करत आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. 

यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. याचपार्श्वभूमिवर पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. यावेळी TET पेपरफुटीचे तपास करणाऱ्या विशेष पथकाने सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक केली. समोर आलेल्या माहितनुसार, सोलापुरातील कुमठे गावात प्रकाश पवार हा ध्रुव प्रतिष्ठान नावाने पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. 

हेही वाचा- Crime News : गुंता वाढला! टेकडीच्या पायथ्याशी बाईक, लॅपटॉप हिस्ट्रीत जीवन संपवण्याचे पर्याय सर्च; बेपत्ता IIT इंजिनिअरबाबत धक्कादायक खुलासे

जवळपास 15-20 वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करणारी अकॅडमी चालवत होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. TET पेपरफुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काही जणांच्या संपर्कात प्रकाश पवार असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

तसेच काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्याने मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे ही कागदपत्रे कोणत्या कारणासाठी देण्यात आली, त्यांचा पेपरफुटीशी काय संबंध आहे आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे सोलापूरमधील परीक्षार्थी उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number