पुण्यातील रिसॉर्टवर पोलिसांचा छापा! देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, 13 मुलींची सुटका; रॅकेटचा म्होरक्या फरार

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू येथील रिसॉर्टवर पोलिसांनी छापेमारी करत 13 मुलींची सुटका केली आहे. राजगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
raid on a resort in velu
raid on a resort in velu

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू येथील रिसॉर्टवर पोलिसांनी छापेमारी करत 13 मुलींची सुटका केली आहे. राजगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 22 ऑक्टोबर संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास वेळू येथील आमराई रिसॉर्टमध्ये करण्यात आली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 महिन्यांपासून आमराई रिसॉर्टमध्ये आरोपी शेट्टी हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेशव्यव्यासाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी संबंधित रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवून तिथे सुरू असलेल्या वेशव्यव्यवसायावर छापा टाकला. यावेळी त्या रिसॉर्टवर एक हजार रुपयांमध्ये महिलांकडून वेश्व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी रिसॉर्टची झडती घेतली असता त्या ठिकाणाहून 13 मुलींची सुटका करण्यात आली आहे. यातील पीडित तरुणी या मुंबई, ठाण्यासह, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : यवतमाळ हादरलं! दोन गटातीलत तुफान हाणामारीनंतर दोघांचा मृत्यू; हल्लेखोर फरार, पोलीस आरोपींच्या शोधात

“ते” रिसॉर्ट राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे?

संबंधित रिसॉर्टच्या मालकी आणि व्यवस्थापनाबाबत आता अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. हे रिसॉर्ट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने इतर व्यक्तीकडे चालवायला दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. पोलिसांना या बाबत विचारले असता संबंधित रिसॉर्ट कुणाच्या मालकीचे आहे, याचा देखील तपास समांतर पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. तसेच रिसॉर्टचे व्यवस्थापन त्यासोबत इतर काही लोकं या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी आहेत का? या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version