बिबट्याच्या कातडी तस्करीत माजी उपसरपंचासह दोघे जेरबंद; नागपूरच्या पथकाची कारवाई

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बिबट्याच्या कातडी तस्करीत माजी उपसरपंचासह दोघे जेरबंद; नागपूरच्या पथकाची कारवाई
selling a leopard skin

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबट्याची कातडी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या प्रादेशिक युनिटने अटक केली आहे. देवरी-पुराडा मार्गावरील ढिवरिनटोला परिसरात सापळा रचून धनराज रामलाल उईके आणि नीलकंठ रामचंद्र पांढरे यांना ताब्यात घेण्यात आले. यातील धनराज उईके हा माजी उपसरपंच असल्याची माहिती आहे. आरोपींकडून पांढऱ्या कापडात गुंडाळलेली बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. कारवाईनंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी देवरी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कातडी कुठून आणली, कोणाला विक्री केली जाणार होती आणि या तस्करीमागे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, नागपूरच्या पथकाने कारवाई केल्याने स्थानिक वन विभागाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या तस्करीची माहिती स्थानिक यंत्रणेला होती का, आणि असल्यास यापूर्वी कारवाई का झाली नाही, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबतची माहिती देवरीतील वन परिक्षेत्र अधिकारी सुभांगी मिश्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा : ठाणे हादरलं! ठाकरे गटाचा नेता ठार; रात्री भररस्त्यात गोळ्या झाडून संपवलं

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर प्रादेशिक युनिटचे अधिकारी आदित्य कुमार बैरवा व जेरी थॉमस यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी सापळा कारवाई केली. यावेळी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळलेली वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत प्रतिबंधित असलेली बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. कारवाईनंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी प्रादेशिक वन विभाग, देवरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला धनराज उईके हा ढीवरिनटोला ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याची माहिती आहे. दरम्यान, दोघांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number