Wednesday, May 14, 2025 10:28:47 PM

बनावट कागदपत्र बनवून तीन बांगलादेशी जामीन घेऊन पसार

बनावट कागदपत्रे आणि बनावट जामीनदार हजर करून तीन बांगलादेशी नागरिकांनी जामीन घेऊन पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड येथील एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.

बनावट कागदपत्र बनवून तीन बांगलादेशी जामीन घेऊन पसार

पुणे: बनावट कागदपत्रे आणि बनावट जामीनदार हजर करून तीन बांगलादेशी नागरिकांनी जामीन घेऊन पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड येथील एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तीन बांगलादेशी आरोपींविरुद्ध आणि एक वकील, बनावट जामीनदार आणि बनावट कागदपत्र तयार करणारा व्यक्ती, अशा एकूण सहा आरोपींविरुद्ध न्यायालयाची आणि पोलिस प्रशासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार असून फरार आरोपींचा शोध एमआयडीसी भोसरी पोलीस घेत आहेत.

हेही वाचा: भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी घेतली बाबासाहेब आगे कुटुंबीयांची भेट

तक्रारीत असे नमूद केले आहे की, बेकायदेशीरपणे जामीन मिळाल्यानंतर जेव्हा त्यांची सुटका करण्यात आली, तेव्हा ते कधीच खटल्यांसाठी न्यायालयात गैरहजर राहिले. त्याचबरोबर, त्यांनी दिलेल्या पत्त्यावरही ते भेटत नसल्यामुळे तीन बांगलादेशी नागरिक फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील दहशतवाद विरोधी शाखेने दोन महिला आरोपींना, सम्राट बलाय बाला (रा. सहयाद्री बांधकाम साईट, लेबर कॅम्प, बो-हाडेवाडी, मोशी, पुणे मुळगांव ग्राम बहादुरपुर, पो. दतोकंदवा, जि. मदारीपुर, बांगलादेश), आरोपींचे जामीन करणारे वकील, आरोपींचे अनोळखी साथीदार (बनावट जामीनदार म्हणून हजर राहिलेले इसम), बनावट कागदपत्रे तयार करणारे अनोळखी इसम आणि जामीन करण्यासाठी सहकार्य करणारे इतर संबंधित यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.


सम्बन्धित सामग्री