Crime News : कानाखाली मारल्याचा बदला घेण्यासाठी पत्नीने पतीचा दगड घालून पाडला मुडदा; रात्रभर केलं असं काही काम की ऐकून डोकं चक्रावेल

मजुरी करणाऱ्या एका जोडप्यामध्ये झालेल्या किरकोळ वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे, या क्रूर कृत्यानंतर ही महिला रात्रभर...

Crime News : कानाखाली मारल्याचा बदला घेण्यासाठी पत्नीने पतीचा दगड घालून पाडला मुडदा; रात्रभर केलं असं काही काम की ऐकून डोकं चक्रावेल

Crime News : क्षुल्लक वादातून पत्नीने पतीला संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात एका घरगुती वादाचा अंत पतीच्या क्रूर हत्याकांडात झाला आहे. मजुरी करणाऱ्या एका जोडप्यामध्ये झालेल्या किरकोळ वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे, या क्रूर कृत्यानंतर ही महिला रात्रभर पतीच्या मृतदेहाजवळ सुन्न होऊन बसून होती.

साध्या वादाचा भीषण शेवट  
मूळचे मध्य प्रदेशातील असलेले अरविंद नायक (23) आणि रेखा नायक (32) हे दाम्पत्य रोजगारासाठी गुजरातच्या तिलकवाडा परिसरात आले होते. दोघेही बांधकाम मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी रात्री भाजीपाला घेऊन घरी परतत असताना, हेरण नदीच्या काठावर त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. रागाच्या भरात अरविंदने रेखाच्या कानाखाली मारली. या अपमानाचा राग सहन न झाल्याने रेखाने जवळच पडलेला मोठा दगड उचलून अरविंदच्या डोक्यात घातला.

रात्रभर मृतदेहाची राखण
दगडाचा प्रहार लागल्याने अरविंद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. निर्जनस्थळ असल्याने कोणालाही मदतीसाठी बोलावता आले नाही. गुन्ह्यानंतर रेखा तिथून पळून न जाता, रात्रभर आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली. शनिवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी हे विदारक दृश्य पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

हेही वाचा – Ashok Kharat Case: 'माझं मरण इथेच…'; भोंदू बाबाच्या पापाचा घडा भरला, चौकशीत उत्तरं देताना अक्षरश: नाकीनऊ

पोलिस कारवाई
नागरिकांनी माहिती देताच टिळकवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी पत्नी रेखा हिला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. केवळ एका कानाखाली मारल्याच्या रागातून उभ्या संसाराचा असा भीषण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number