Pune Police Suspends: पुण्यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन; धक्कादायक कारण समोर

खेड शिवापूर चौकीत कार्यरत असलेल्या प्रमिला निकम (हवालदार) आणि अजित मेस्त्री (नाईक) अशी कठोर कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Pune Police Suspends: पुण्यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचे  निलंबन; धक्कादायक कारण समोर

Pune Police Suspended: खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत गंभीर घटना पुण्यात समोर आली असून, थेट व्यापाऱ्याला गाठून कोट्यवधी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. खेड शिवापूर चौकीत कार्यरत असलेल्या प्रमिला निकम (हवालदार) आणि अजित मेस्त्री (नाईक) अशी कठोर कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या धडक निर्णयामुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कार अडवून खंडणी वसूल करण्याचा कट

नवले पुलाच्या परिसरात एका व्यापाऱ्याची चारचाकी गाडी अडवून त्याच्याकडील तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड बळकावण्याचा कट रचण्यात आला होता. या गुन्हेगारी कृत्यात निकम आणि मेस्त्री यांचा थेट सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. खाकी वर्दीचा धाक दाखवून स्वतःचे उदरभरण्याचा हा प्रयत्न अंगलट आल्यानंतर नऱ्हे पोलिस ठाण्यात दोघांविरोधात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा – Pune Crime : धक्कादायक! दोन सख्ख्या बहिणींवर 60 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार; बळजबरीने घरी नेले अन्…

चौकशी समिती स्थापन; कठोर कारवाईचे संकेत

आपल्याच दलातील कर्मचाऱ्यांचे असे कारनामे उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिस प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवली. या प्रकरणात केवळ निलंबनावर न थांबता, संपूर्ण घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी एका विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर करणे आणि पदाचा दुरुपयोग करून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणे या कारणास्तव ही बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून, चौकशीअंती अधिक कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number