Pawanraje Nimbalkar Case: निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याचा निकाल लांबणीवर; आता ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अंतिम निकालपत्र पूर्ण करण्यासाठी आणखी काही अवधी आवश्यक असल्याचे सांगत निकाल पुढे ढकलला.

Pawanraje Nimbalkar Case: निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याचा निकाल लांबणीवर; आता ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

Pawanraje Nimbalkar Case: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी खून खटल्याचा निकाल आज जाहीर होऊ शकला नाही. मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अंतिम निकालपत्र पूर्ण करण्यासाठी आणखी काही अवधी आवश्यक असल्याचे सांगत निकाल पुढे ढकलला. तब्बल दोन दशकांच्या कायदेशीर लढाईनंतरचा हा महत्त्वपूर्ण न्यायनिवाडा आता 20 जून 2026 रोजी सुनावला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्य आरोपींची न्यायालयात हजेरी

मंगळवारी सकाळी 11 वाजता मुंबई सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट ॲम्ब्युलन्समधून न्यायालयात दाखल झाले. त्यांना व्हीलचेअरच्या सहाय्याने कोर्टात आणण्यात आले. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, जयराजे निंबाळकर, आनंदीदेवी निंबाळकर तसेच दिवंगत समद काझी यांच्या पत्नी आणि सुपुत्र न्यायालयात उपस्थित होते. न्यायाधीशांनी सर्व आरोपींची हजेरी नोंदवून घेतल्यानंतर निकालपत्र तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागणार असल्याने 20 जून ही पुढील तारीख निश्चित केली.

दरम्यान, निकाल पुढे ढकलल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली. हा लढा केवळ एका खटल्याचा नसून, सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून सामान्यांच्या जीवाची किंमत न मानणाऱ्या प्रवृत्तीविरोधातील संघर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांच्या हत्येला 20 वर्षे 13 दिवस पूर्ण झाले असून, दोन्ही कुटुंबे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी नमूद केले. आज निकाल लागेल अशी अपेक्षा होती, मात्र न्यायाला पुन्हा विलंब झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी केल्याचेही सांगितले.

कोण आहेत डॉ. पद्मसिंह पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांनी धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक दशके प्रभाव राखला. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या पाटील यांनी राज्यात गृह, सिंचन आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत. मात्र, 2006 मध्ये त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सीबीआयने केल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला. यापूर्वी 2005 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उघडकीस आणलेल्या साखर कारखान्यांतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात पी. बी. सावंत समितीनेही त्यांच्यावर गंभीर ठपका ठेवला होता.

हेही वाचा – Shiv Sena UBT Rebellation : ठाकरे गटात पुन्हा बंडाची ठिणगी? 7 खासदार फुटण्याच्या चर्चेने खळबळ; डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंचे मोठे पाऊल

धाराशीवमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क

पद्मसिंह पाटील आणि निंबाळकर घराण्यातील दीर्घकालीन राजकीय संघर्ष लक्षात घेता हा खटला धाराशीव जिल्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. निकाल पुढे ढकलला गेला असला तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हायअलर्टवर ठेवले आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर गुप्तचर विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच समाजमाध्यमांवर अफवा पसरू नयेत यासाठी सायबर सेलकडूनही विशेष पाळत ठेवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number