बीड कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप होत आहे.

बीड कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट?

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप गत काही दिवसात केले जात असून आता मसाजोग अद्यतन या व्हॉटस्‌‍अप ग्रुपवर हे आरोप व्हायरल झाले आहेत. यामध्ये कारागृहातील अधिकारी बक्सार मुलाणी व कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे व सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार असल्याचे समजते.                             

वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होत आहे. देशमुख कुटुंबीय माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागवणार असल्याचे माहिती आहे. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार असल्याचे देशमुख कुटुंबाच्या सदस्यांनी सांगितले आहे. याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची माहिती देऊन तक्रार केली जाणार आहे.

हेही वाचा : Pune Rape Case: दत्तात्रय गाडेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

जेलमध्ये कराड, कोण पुरवतंय लाड?

15 जानेवारीला कारागृहातील स्वयंपाकगृहातून कराडसाठी स्पेशल चहा देण्यात आला. 22 जानेवारीला कराडची झाडाझडती न घेता पोलीस पुन्हा तुरुंगात घेऊन गेले. कराडला दवाखान्यात पाठवताना कर्तव्यावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यानं कराडच्या नातेवाईकांना सामान देण्यात आलं. 18 फेब्रुवारीला ई मुलाखतीसाठी कराडला ऑफिसमध्ये बोलवून स्पेशल चहा, जेवण दिलं. कराडच्या नातेवाईकांना संपर्क करुन माहितीची देवाणघेवाण करत असल्याचा आरोप आहे. कारागृह कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, गोंविद खाडे, विश्वनाथ गीते, सुधाकर मुंडे, राहुल राठोड, वैजनाथ मुंडे, अशोक सानप यांच्यावर मदतीचा ठपका लावण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number