हॉटेलच्या खोलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू; मध्यरात्रीच्या वादानंतर जोडीदार फरार, पडद्याच्या रॉडने वाढवला संशय

34 वर्षीय बँक कर्मचारी बी. सिरिशा हिचा हॉटेलच्या खोली क्रमांक 103 मध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला. सिरिशा ही विकाराबाद जिल्ह्यातील नागसमुद्रम येथील रहिवासी असून एका बँकेत 'कस्टमर-केअर एक्झिक्युटिव्ह' म्हणून कार्यरत होती.

हॉटेलच्या खोलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू; मध्यरात्रीच्या वादानंतर जोडीदार फरार, पडद्याच्या रॉडने वाढवला संशय
हॉटेलच्या खोलीत महिलेचा संशयास्पद मृत्य

Crime News: हैदराबादमधील एस.आर. नगर भागात असलेल्या धरम करम रोडवरील ‘गोकुळ प्राईड हॉटेल’मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 34 वर्षीय बँक कर्मचारी बी. सिरिशा हिचा हॉटेलच्या खोली क्रमांक 103 मध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला. सिरिशा ही विकाराबाद जिल्ह्यातील नागसमुद्रम येथील रहिवासी असून एका बँकेत ‘कस्टमर-केअर एक्झिक्युटिव्ह’ म्हणून कार्यरत होती. तिच्यासोबत हॉटेलमध्ये राहणाऱ्या 38 वर्षीय ए. श्रीनिवास याच्याशी मध्यरात्री झालेल्या तीव्र वादामुळे आणि प्राणघातक हल्ल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एसआर नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

बनावट नावाने मुक्काम अन् पहाटे आरोपी फरार

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरिशा आणि श्रीनिवास यांनी हॉटेलमध्ये चेक-इन करताना बनावट नावे आणि ओळखपत्रांचा वापर केला होता. श्रीनिवासने ‘गणेश’ तर सिरिशाने ‘दुर्गा’ या नावाने नोंदणी केली होती. श्रीनिवास 9 सप्टेंबरपासून तर सिरिशा 24 सप्टेंबर रोजी हॉटेलमध्ये आली होती. मंगळवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता श्रीनिवास एकटाच हॉटेलमधून बाहेर पडला आणि सिरिशा नाश्ता करून नंतर बाहेर येईल, असे रिसेप्शनला सांगून निघून गेला. दुपारी अनेक तास उलटूनही खोलीतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. अतिरिक्त चावीच्या साहाय्याने खोली उघडली असता, सिरिशाचा मृतदेह बेडवर संशयास्पद स्थितीत आढळला.

पडद्याच्या रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा संशय

जुबली हिल्सचे डीसीपी ए. रमणा रेड्डी यांच्या माहितीनुसार, रात्री दोघांमध्ये तुफान वाद झाला असावा आणि त्यातूनच श्रीनिवासने सिरिशावर बोथट वस्तूने किंवा पडद्याच्या रॉडने (curtain rod) जीवघेणा हल्ला केला असावा. घटनास्थळी ‘क्लूज टीम’ने भेट देऊन फॉरेन्सिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तपासात असेही समोर आले आहे की, सिरिशा आणि श्रीनिवास एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात जवळचे संबंध होते. श्रीनिवासने तिच्याशी मंदिरात विवाह केल्याचेही काही स्थानिक सूत्रांकडून समजते, मात्र पोलीस सर्व बाजू पडताळून पाहत आहेत.

हेही वाचा –Exclusive: दोन वर्षांपूर्वीच रचला कट…गणेशोत्सवापासून प्लॅनिंग सुरू…कॉलद्वारे संपवण्याची भाषा…; प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक दावा

पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली

श्रीनिवासचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली असून त्याच्या मूळ गावासह प्रमुख वाहतूक केंद्रांवर छापे मारले जात आहेत. याशिवाय, सिरिशाच्या भूतकाळातील घटनांची आणि तिने यापूर्वी घेतलेल्या वैद्यकीय उपचारांचीही माहिती पोलीस गोळा करत आहेत. दोघांनी बनावट ओळखपत्रे का वापरली आणि मृत्यूचे नेमके कारण काय होते, याचा उलगडा श्रीनिवासच्या अटकेनंतर व फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number