Crime News: लग्नाला नकार दिल्याने प्रियकराचं भयंकर कृत्य; आधी प्रेयसीचा गळा दाबला, नंतर मृतदेहावर पेट्रोल ओतलं अन्…

गुन्हा केल्यानंतर ही घटना केवळ अपघात वाटावी यासाठी आरोपीने तिच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.

Crime News: लग्नाला नकार दिल्याने प्रियकराचं भयंकर कृत्य; आधी प्रेयसीचा गळा दाबला, नंतर मृतदेहावर पेट्रोल ओतलं अन्…

Crime News:  लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका माथेफिरू तरुणाने आपल्या मैत्रिणीला गळा आवळून संपवल्याची भयंकर घटना मध्य प्रदेशात समोर आली आहे. गुन्हा केल्यानंतर ही घटना केवळ अपघात वाटावी यासाठी आरोपीने तिच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या काही तासांत आरोपी मयांक शाक्य याला बेड्या ठोकल्या आहेत. मृत तरुणी आयसीआयसीआय (ICICI) बँकेत नोकरीला होती.

अपघाताचा बनाव अन् पोलिसांचा संशय
26 वर्षीय मृत तरुणी पलक ही मूळची हरदा जिल्ह्यातील टिमरनी येथील रहिवासी असून ती इंदूरमधील तपेश्वरी बाग कॉलनीमध्ये भाड्याने राहत होती. तिच्या खोलीत रविवारी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनास्थळी गॅस शेगडी, सिलेंडर आणि चिरलेली भाजी विखुरलेली असल्याने सुरुवातीला स्वयंपाक करताना आगीचा भडका उडून हा अपघात झाल्याचा आभास निर्माण झाला होता. परंतु, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

सीसीटीव्ही अन् टेक्निकल सर्व्हेलन्सने उघडकीस आणले सत्य
घटनेचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एक संशयित तरुण तोंडाला रुमाल बांधून आणि पाठीवर बॅग घेऊन त्या घरातून बाहेर पडताना दिसला. यानंतर पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीने कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनचे विश्लेषण केले. तपासाचा रोख मयांक शाक्यकडे वळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

6 वर्षांच्या ओळखीचा धक्कादायक शेवट
कुलर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मयांकची आणि पलकची गेल्या 6 वर्षांपूर्वी भेट झाली होती. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. मयांकला तिच्याशी विवाह करायचा होता, मात्र पलकच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता. कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित केल्याने मयांक अत्यंत संतप्त झाला होता आणि त्याने तिच्या हत्येचा कट रचला.

हेही वाचा – IIT Website Hacked : प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्याने हॅक केली IIT ची वेबसाईट; पोलिसांत तक्रार करण्याऐवजी संस्थेने दिली 'ही' अनोखी ऑफर

वादातून धक्का दिला अन् गळा दाबून घेतला जीव
घटनेच्या दिवशी मयांक पेट्रोलची बाटली सोबत घेऊन तिच्या घरी पोहोचला. लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादादरम्यान मयांकने तिला जोरात जमिनीवर ढकलले आणि तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गुन्ह्याचा सुगावा लागू नये म्हणून तिच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून आग लावली आणि तो पसार झाला. या दुर्दैवी घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number